BITS Pilani Goa Student Death Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: ‘बिट्स’ पिलानीबाबत मोठी अपडेट! विद्यार्थी मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली क्लीन चिट; चौकशी अहवाल सादर

BITS Pilani Goa Student Death: अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत सांकवाळ येथील ‘बिट्स पिलानी’ शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत सांकवाळ येथील ‘बिट्स पिलानी’ शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

त्यामुळे या संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत असतानाच या शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणारी सर्व यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उभारली आहे,

असा अहवाल दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी सरकारला सादर करून या शैक्षणिक संस्थेला क्लीन चिट दिली आहे. फेब्रुवारीमध्ये या संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बंगळुरू येथील २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती.

मानसिक आरोग्यासाठी पुरेशा सुविधा

बिट्सच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र उभारले असून तेथे दोन क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, दोन थेरपिस्ट, एक सायकियाट्रीक असून पुरेशा क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याबरोबर विरंगुळ्यासाठी सुसज्ज वाचनालय आणि इतर उपक्रम आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार उपाययोजना

१ क्लिटस म्हणाल्या, मी चौकशी समितीचा अहवाल सादर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार सर्व उपाय योजण्यात आल्या आहेत, असे अहवालात नमूद केले आहे.

२ सहाव्या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर केंद्रात कुठली मानसिक आधार यंत्रणा आहे, याची यादी बिट्स गोवा व्यवस्थापनाला सादर करण्यास सांगितले होते. व्यवस्थापनाने सादर केलेली उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करणारी आहेत हे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

SCROLL FOR NEXT