BITS Pilani: 'बिट्स पिलानी'तील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हावी! गोवा फॉरवर्ड युवा शाखेचे राज्यपालांना निवेदन

BITS Pilani Students Death: गोवा फॉरवर्डच्या युवा शाखेचे अध्यक्ष हृतिक मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखालील वृषांक गावकर, सोहम राऊत आणि क्रिश व बाळ्ळीकर यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पुसपती राजू यांची भेट घेतली.
BITS Pilani Students Death
BITS Pilani Students DeathDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फॉरवर्डच्या युवा शाखेचे अध्यक्ष हृतिक मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखालील वृषांक गावकर, सोहम राऊत आणि क्रिश व बाळ्ळीकर यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल पुसपती राजू यांची भेट घेतली आणि बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

हृतिक मांद्रेकर यांनी सांगितले की, डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बिट्समध्ये नोंद झाली आहे आणि प्रत्येक प्रकरणात या घटना परीक्षा काळात किंवा तीव्र शैक्षणिक दबावाच्या टप्प्यात घडल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना किती तीव्र ताण सहन करावा लागतो, हे स्पष्ट होत आहे.

BITS Pilani Students Death
Goa Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणं पडलं महागात; 'लंडन'च्या भामट्याकडून चिंबलच्या महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा!

सहा तरुणांचे प्राण गेले तरी, अद्याप कोणताही तपशीलवार चौकशी अहवाल सार्वजनिक केलेला नाही, ज्यामुळे पारदर्शकता आणि संस्थात्मक जबाबदारीबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. हे अहवाल फायलींत बंदिस्त राहू शकत नाहीत. विद्यार्थी आणि पालकांना सत्य कळले पाहिजे आणि सुधारात्मक उपाययोजना त्वरित अंमलात आणल्या पाहिजेत, असेही मांद्रेकर म्हणाले.

BITS Pilani Students Death
Goa Sexual Assault Case: बाबूश मोन्सेरात यांची 9 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; 2016 च्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

‘युवा फॉरवर्ड’च्या शिष्टमंडळाने या प्रकरणी उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी, सर्व निष्कर्षांचे संपूर्ण सार्वजनिक प्रकटीकरण आणि कॅम्पसमध्ये सुरू असलेली समुपदेशन प्रणाली, विद्यार्थी कल्याण यंत्रणा आणि ताण-व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी तातडीने सुधारणांची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com