LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

बिट्स पिलानीमध्ये पाच नव्हे सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, युरी आलेमाव यांचा दावा; आकाश गुप्ताचा मृत्यू का लपवला?

BITS Pilani Goa student deaths: २० फेब्रुवारी २०२४ रोजी सांकवाळच्या बिट्स पिलानीमध्ये शिकणाऱ्या आकाश आशिषकुमार गुप्ता या २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, ही घटना सर्वांपासून लपविली गेली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: बिट्स पिलानीच्या विद्यार्थी मृत्यू संदर्भात रोज नवनवीन बातम्या येत असतानाच आता आणखी एक सनसनाटी बाब उजेडात आली आहे. आतापर्यंत मागच्या दहा महिन्यांत बिट्समध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, बिट्समधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा हा सिलसिला गतवर्षीच्या फेब्रुवारीपासून सुरू आहे, त्यामुळे ही संख्या सहावर पोचली आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा आरोप केला. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सांकवाळच्या बिट्स पिलानीमध्ये शिकणाऱ्या आकाश आशिषकुमार गुप्ता या २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, ही घटना सर्वांपासून लपविली गेली.

ऋषी मृत्यूची सखोल चौकशी व्हावी !

बिट्स पिलानीमधील ऋषी नायर या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी 'आप'चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याकडे केली आहे.

सिल्वा यांनी आपच्या कार्यकर्त्यासमवेत वर्मा यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. आतापर्यंत बिट्स पिलानीमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. नायर याच्या मृतदेहाच्या शल्यचिकित्सा अहवालात इग्स सापडले आहेत. ही गंभीर घटना आहे. सखोल चौकशीची गरज असल्याचे सिल्वा म्हणाले

ऋषीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समिती !

ऋषी नायर या विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूवर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT