Luthra Brothers Dainik Gomantak
गोवा

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

Luthra Brothers Owners Of Birch by Romeo Lane nightclub Goa: दिल्ली विमानतळावरुन कडक पोलिस बंदोबस्तात निघालेले लुथरा बंधू सकाळी अकरा वाजता मोपा विमानतळावर दाखल.

Pramod Yadav

पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेनचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा अखेर कडक पोलिस बंदोबस्तात गोव्यात दाखल झाले आहेत. बुधवारी (१७ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता गोवा पोलिसांच्या पथकासह लुथरा बंधू पेडण्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. लुथरा बंधू मंगळवारी (१६ डिसेंबर) थायलंडमधून दिल्लीत दाखल झाले होते.

बँकॉक, थायलंड येथून विमानाने दिल्लीत दाखल झाल्यानंतर लुथरा बंधुंना गोवा पोलिसांनी अटक केली. यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण केल्यानंतर सकाळी दोघांना दिल्लीतून गोव्यात आणण्याची तयारी सुरु करण्यात आली.

दिल्ली विमानतळावरुन कडक पोलिस बंदोबस्तात निघालेले लुथरा बंधू सकाळी अकरा वाजता मोपा विमानतळावर दाखल. यावेळी विमानतळाबाहेर देखील कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. नाईटक्लबला लागलेल्या आगीनंतर क्लबचे मालक लुथरा बंधुंनी थायलंडला पलायन केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करुन थायलंडमध्ये अटक करण्यात आली होती.

मंगळवारी थायलंडमधून डिपोर्ट केल्यानंतर दोघेही दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत अगोदरच दाखल झालेल्या गोवा पोलिसांनी लुथरा बंधुंना अटक करुन बुधवारी गोव्यात घेऊन आले आहेत.

पुढील कारवाईसाठी लुथरा बंधुंना हणजूण पोलिस स्थानकात हजर केले जाणार आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी लुथरा बंधुंच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुथरा बंधुंनी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT