Goa Bike Stunt Viral Video Dainik Gomantak
गोवा

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

Goa Bike Stunt Viral Video: गोव्यातून जीवघेण्या स्टंटबाजीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sameer Amunekar

गोव्यातून जीवघेण्या स्टंटबाजीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने रहदारी असलेल्या रस्त्यावर चालत्या दुचाकीवर उभे राहून धोकादायक स्टंट केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

ही स्टंटबाजी केवळ स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करणारी नसून, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठीही प्रचंड घातक ठरू शकते. मुख्य रस्त्यावर अशी बेफिकीर कृत्ये केल्यास कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतो, याची जाणीव असूनही काही तरुण असे प्रकार करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळण्याची गरज नाही,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. तर काहींनी वाहतूक पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, गोव्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या स्टंटबाजीच्या घटना समोर आल्या असून, पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. मात्र तरीही काही तरुण कायद्याचे उल्लंघन करत धोकादायक प्रकार करताना दिसत आहेत, ही गंभीर बाब मानली जात आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून केलेली स्टंटबाजी ही केवळ गुन्हाच नाही, तर अनेकांच्या जीवावर बेतू शकणारी बाब आहे. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडिओंची दखल घेऊन संबंधितांवर कडक पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना रोखता येतील, अशी जोरदार मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT