Goa Politics: 'त्यांना जर जवळ केले तर लोक काय म्हणतील'? फुटिरांच्या विरोधात LOP आलेमाव यांचा सवाल; इजिदोरच्या फॉरवर्ड प्रवेशावर नाराजी

Yuri Alemao: आलेमाव म्हणाले, भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी लोकांची आणि काँग्रेस पक्षाचीही भूमिका आहे.
Yuri Alemao, Amit Patkar
Yuri Alemao, Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: काँग्रेस पक्ष कायम पक्ष फुटिरांच्या विरोधात आहे आणि याबाबत आम्ही कुठलाही समझोता करू पाहत नाहीत, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मडगावात सांगितले.येथील दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेसची बैठक घेण्यात आली.

मडगाव येथे झालेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीला प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, गिरीश चोडणकर व एम. के. शेख हे उपस्थित होते.

यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी इजिदोर यांच्या प्रवेशाचा स्पष्ट उल्लेख न करता सध्या काही ज्या नवीन घडामोडी घडल्या आहेत, त्यावर आम्ही आमच्या युतीतील सहयोगी पक्षांच्या नेत्यांकडे बोलणी करून स्पष्टीकरण घेऊ असे सांगत मी इतर दोन पक्षांच्या पुढाऱ्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे, असे सांगितले.

पक्ष फुटिरांना काँग्रेसमध्ये पुन्हा स्थान नाही, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली असताना त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने इजिदोर फर्नांडिस यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने काँग्रेस पक्षात कमालीची नाराजी पसरली असून मडगाव येथे जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी नेमलेल्या खास समितीच्या बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.

यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या तीन पक्षात युती होणार की नाही? यावरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

Yuri Alemao, Amit Patkar
Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

आलेमाव म्हणाले, भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी लोकांची आणि काँग्रेस पक्षाचीही भूमिका आहे. पण काँग्रेस पक्ष बदलूंच्या विरोधात आहे आणि या आमच्या भूमिकेकडे आम्ही समझोता करू शकत नाहीत.

काँग्रेस पक्षांत अशा पक्ष फुटीरांना कधीच स्थान मिळणार नाही. एका बाजूने अशा फुटिरांविरोधात आम्ही न्यायालयीन लढा लढत आहोत आणि त्यांनाच जर आम्ही जवळ केले तर लोक काय म्हणतील? असा सवाल त्यांनी केला.

Yuri Alemao, Amit Patkar
Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

काही उमेदवार निश्‍चित!

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आजची ही बैठक काँग्रेसचे उमेदवार ठरविण्यासाठी होती. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे, तिथे आम्ही काही उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांना प्रचार सुरू करण्यासही आम्ही सांगितले आहे, असे स्पष्ट केले. युतीबद्दल विचारले असता, सहयोगी पक्षाच्या नेत्यांकडे बोलणी करून काही मुद्द्यावर स्पष्टता घेतल्यावरच आम्ही अंतिम निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com