Cashew Farm | Dainik Gomantak
गोवा

Cashew Farm Fire: म्हाऊस येथे काजू बागायतीत मोठी आग; तब्बल 50 हजारांचे नुकसान

म्हाऊस सत्तरी येथे काल दुपारी सुमारे तीनशेहून अधिक झाडे असणाऱ्या काजू बागायतीत अचानक आग लागली.

दैनिक गोमन्तक

Fire in Cashew Farm Sattari: म्हाऊस सत्तरी येथे काल दुपारी नामदेव राणे कुटुंबियांच्या काजू बागायतीला आग लागून जवळपास 50 हजारांचे नुकसान झाले आहे. बागायतीत सुमारे तीनशेहून अधिक झाडे आहेत. दुपार दोनच्या वेळी आग लागल्याने आगीने पेट धरला.

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन जवानांनी घटनास्थळी येऊन तातडीने मदत कार्य केले. आगीत एकूण 50 हजारांचे नुकसान झाले. तर अग्निशमन दलाला 80 हजारांची काजू झाडे वाचविण्यात यश आले.

वीज वाहिन्यांत बिघाड झाल्याने आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. अग्नीशामन जवान श्रीकांत गावकर, कृष्णा नाईक, तुळशीदास झर्मेकर, महादेव गावडे, सोमनाथ गावकर, अमोल चोर्लेकर, आनंद शेटकर, रुपेश गावकर आदींनी मदतकार्य केले.

गाईला जीवनदान

कोपार्डे-सत्तरी येथील डेरी फार्म आज संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान रस्त्याच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या चेंबरमध्ये पडलेल्या गाडीला वाळपई अग्नीशामन दलाच्या जवानातर्फे जीवनदान देण्यात आले. यावेळी जवान कृष्णा नाईक यांनी मदत कार्य करुन गाईला चेंबरमधून सुखरुप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT