Margao Municipality: पालिकेला मंजूर झालेले ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ 24 तासांत रद्द कारण...

मडगाव पालिकेत 6 महिन्यांच्या करारावर हंगामी स्वरूपात 10 डाटा एन्ट्री ऑपरेटर घेण्याचे ठरले होते.
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak

Margao Municipality: मडगाव पालिकेतील नगरसेवकानी आपल्याच सग्या सोयऱ्यांची नावे घुसडल्याची तक्रार पलिका प्रशासन मंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचल्याने मडगाव पालिकेला नोंदी दाखल करून घेण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 10 डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या नियुक्त्या अवघ्या 24 तासांत रद्द करण्यात आल्या.

नगर विकास खात्यातील रिसर्च असिस्टंट झोझिमा फर्नांडिस यांनी 1 तारखेला हा नियुक्ती आदेश जारी केला होता. मात्र, काल तारखेला नवा आदेश काढून या नियुक्त्या रद्द केल्याचे त्यानी कळवले आहे.

मडगाव पालिकेत 6 महिन्यांच्या करारावर हंगामी स्वरूपात 10 डाटा एन्ट्री ऑपरेटर घेण्याचे ठरले होते. मात्र नगरसेवकांनी त्यात स्वतःच्याच नातलगांची नावे घुसडली.

प्राप्त माहितीनुसार या संबधीची तक्रार नगर विकास मंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर नियुक्ती रद्दचा नवीन आदेश निघाला. दरम्यान, प्रतिक्रियेसाठी नगराध्यक्ष शिरोडकरांशी संपर्क होऊ शकला नाही.

Margao Municipality
Goa Environment: सौर उर्जा उपकरणांसाठी सरकारचे 50 टक्के अनुदान पण...

कहानी में ट्विस्ट

नगर विकास खात्याकडून रद्द करण्यात आलेल्या त्या नियुक्त्या गुरुवारी सायंकाळी पुन्हा वैध ठरविण्यात आल्या. मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्याशी रात्री उशिरा संपर्क झाला.

त्यावेळी त्या 10 डाटा एन्ट्री ऑपरेटरना पुन्हा कामावर घेण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. नगरविकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार हा नवीन आदेश जारी केल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com