Sarvona Karapur Waste, Bicholim waste Dainik Gomantak
गोवा

Sarvona Karapur: एकीकडचा कचरा, दुसरीकडे फेकला! कारापूर-सर्वणमध्ये रोलिंगमिल भागात दुर्गंधी; ‘जाळी’चा प्रयोग ठरला कुचकामी

Sarvona Karapur Waste: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समज दिल्यानंतर कारापूर-सर्वण पंचायतीने विशेष मोहीम हाती घेऊन कचऱ्यावर नियंत्रण येण्यासाठी उपाययोजना केली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समज दिल्यानंतर कारापूर-सर्वण पंचायतीने विशेष मोहीम हाती घेऊन कचऱ्यावर नियंत्रण येण्यासाठी उपाययोजना केली आहे. दुसऱ्याबाजूने रोलिंगमिल परिसरात रस्त्याच्या बाजूने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.

ज्याठिकाणी कचरा साचला आहे, तो परिसर डिचोली पालिका क्षेत्रात येत आहे. असे वाटत असले, तरी हा परिसर कारापूर-सर्वण पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत आहे. खुद्द डिचोली पालिकेने तसा दावा केला आहे.

महिन्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत हे कारापूर पंचायतीत आले होते. त्यावेळी सर्वण येथील अंतर्गत रस्त्याच्या बाजूने साचलेला कचरा पाहून मुख्यमंत्री बरेच नाराज झाले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कडक समज दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कारापूर पंचायतीने व्यापक स्वच्छता मोहीम हातात घेताना सर्वणसह पंचायत क्षेत्रातील कचरा काढून परिसर चकाचक केला होता.

मात्र, रोलिंगमिल येथे रस्त्याच्या बाजूने कचरा साचला असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रोगराई पसरण्याची भीती आहे. स्थानिक पंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकवेळी पालिकेने हा कचरा का म्हणून काढावा, असा प्रश्न एका नगरसेवकाने उपस्थित केला आहे.

गोकुळवाडा भागा ‘जाळी’ पडली खाली

रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे प्रमाण नियंत्रणात यावे, यासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने कचऱ्यासाठी हॉटस्पॉट बनलेल्या विविध भागात ‘जाळी’ मारली आहे. मात्र, काही ठिकाणी ‘जाळी’आड कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. गोकुळवाडा येथे डिचोलीच्या रस्त्याच्या बाजूने लावलेली ‘जाळी’ खाली पडली आहे. जाळी व्यवस्थित लावली नसल्याने ती खाली पडली आहे, की कचराफेकूंनी या जाळीची ही अवस्था केलीय, ते कळणे मुश्किल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT