Karapur Sarvona: कचऱ्यावरती लावला ‘कचरा टाकू नका’ फलक, कारापूर-सर्वण पंचायतीचा अजब कारभार

Karapur Sarvona garbage issue: साचलेला कचरा काढण्याकडे दुर्लक्ष करून ‘सूचना फलक’ लावण्याच्या या प्रकाराबद्दल स्थानिक लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
Karapur Sarvona garbage issue
Goa waste problemDainik Gomantak
Published on
Updated on

Karapur Sarvona Waste Issue

डिचोली: साचलेला दुर्गंधीयुक्त कचरा हटवणे सोडाच, उलट त्याच कचऱ्यावर ‘कचरा टाकण्यास बंदी’ अशा आशयाचे सूचना फलक लावले आहेत. हा अजब प्रकार कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात घडला आहे. आज (शुक्रवारी) पंचायतीतर्फे सर्वण भागात हे सूचना फलक लावले आहेत.

कचरा टाकताना जर कोणी आढळून आल्यास त्याला २५ हजारपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही या सूचना फलकाद्वारे देण्यात आला आहे.

साचलेला कचरा काढण्याकडे दुर्लक्ष करून ‘सूचना फलक’ लावण्याच्या या प्रकाराबद्दल स्थानिक लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. साचलेला कचरा आता कोण काढणार. कचऱ्याच्या राशीवर सूचना फलक लावण्याचे प्रयोजन काय? असे प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. फक्त सूचना फलक लावण्यापुरतीच पंचायतीची जबाबदारी मर्यादित आहे काय? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Karapur Sarvona garbage issue
Karapur - Sarvan News : कारापूर-सर्वणच्या सरपंचपदी तन्वी सावंत बिनविरोध निवड

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सर्वण गावात तर अंतर्गत रस्त्याच्या बाजूने सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, हा कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे.

विशेष म्हणजे पंचायतीतर्फे घरोघरी कचऱ्याची उचल होत असली, तरी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत. उघड्यावर आणि रस्त्याच्या बाजूने कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात पंचायतीने दंडात्मक कारवाई करावी, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.

Karapur Sarvona garbage issue
Karapur Sarvan: दुर्गंधीयुक्त कचऱ्यात गुदमरतोय सर्वण-कारापूरवासीयांचा श्‍‍वास!

कचऱ्याकडे पंचायतीचे दुर्लक्ष

कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यू वाडा, सर्वण आदी भागात कचऱ्याची समस्या आहे. भर रस्त्यावरील कचरा काढण्याकडे स्थानिक पंचायतीचे लक्ष जात नसल्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सर्वण येथे रस्त्याच्या बाजूने कुजलेला दुर्गंधीयुक्त कचरा पंचायतीने त्वरित हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com