Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : घोडा सुटला अन् डिचोलीत घुसला..! वाहनचालकांची तारांबळ

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, सकाळी साधारण सव्वानऊची वेळ. नेहमीप्रमाणे रस्त्यांवरुन वाहनांची वर्दळ आणि पादचाऱ्यांची ये - जा सुरू असते. अशावेळी एक घोडा चक्क शहरात घुसून रस्त्यावर नाचू लागतो.

गोंधळलेल्या या घोड्याच्या उपद्रवामुळे मग सर्वांची तारांबळ उडते. हा काही काल्पनिक किंवा एखाद्या चित्रपटातील प्रसंग नव्हे, तर या प्रसंगाचा अनुभव आज (शुक्रवारी) डिचोलीत अनुभवायला मिळाला.आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एक घोडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ अवतरला. हा घोडा गोंधळलेल्या अवस्थेत होता. घोडा मिळेल तिकडे धावत होता.

साधारण अर्धा तास हा घोडा सर्कल परिसरातच होता. गोंधळलेल्या या घोड्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम होत होता. घोडा हल्ला करणार, या शक्यतेने काहीजण घाबरूनही गेले. घोडा जवळ येत असल्याचे काही दुचाकीस्वारांनी दुचाकी जाग्यावरच सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. साधारण अर्धा तास घोड्याचा खेळ चालला होता. सुदैवाने या घोड्याने मात्र कोणावरही हल्ला केला नाही. हा घोडा कोठून आणि शहरात कसा अवतरला याबद्दल बराचवेळ चर्चा चालू होती. अखेर हा पाळीव घोडा मये येथून चुकून शहरात घुसल्याचे समजले.

असाही योगायोग :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोली नगरीत कालच (गुरुवारी) शिवराज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी शहरात घोडा अवतरणे आणि तोसुद्धा चक्क शांतादुर्गा विद्यालयासमोरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ. याला योगायोगच म्हणावा लागेल. अनेकांनी या प्रसंगाबद्धल आश्चर्य व्यक्त केले. शिवप्रेमीही हा योगायोग असल्याचे म्हणत होते.

घोडा अखेर जेरबंद

घोडा चुकून शहरात घुसल्याचे समजताच, स्थानिक नगरसेवक अनिकेत चणेकर यांनी प्राणीमित्र अमृतसिंग यांच्याशी संपर्क साधला. अमृतसिंग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोरखंडाच्या सहकार्याने घोड्याला जेरबंद केले. अनिकेत चणेकर यांनीही त्यांना सहकार्य केले. तोपर्यंत घोड्याचा मालक डिचोलीत आला आणि अखेर घोड्याला घेवून ते गेले. त्यानंतर घाबरलेल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT