Virat Kohli Record: कोहलीचा धमाका! सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडीत काढत रचला इतिहास; 16 हजारी क्लबमध्ये दिमाखदार एन्ट्री Watch Video

Vijay Hazare Trophy 2025: टीम इंडियाचा 'रन मशीन' विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानावर परतला. विशेष म्हणजे, त्याने पहिल्याच चेंडूवर जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला.
Virat Kohli Record
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Completes 16000 Runs: टीम इंडियाचा 'रन मशीन' विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानावर परतला. विशेष म्हणजे, त्याने पहिल्याच चेंडूवर जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला. दिल्लीकडून आंध्राविरुद्ध 'विजय हजारे ट्रॉफी 2025-26' चा आपला पहिला सामना खेळताना कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16000 धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला. तर वेगाच्या बाबतीत त्याने मास्टर ब्लास्टरलाही मागे सोडले.

मैदानावर पाऊल ठेवताच विक्रमाची गवसणी

बंगळुरु येथील 'बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस' मैदानावर दिल्ली आणि आंध्रा यांच्यात हा चुरशीचा सामना रंगला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आंध्राने दिलेल्या 299 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. अवघ्या 1 धावसंख्येवर दिल्लीचा पहिला सलामीवीर बाद झाल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये 'कोहली-कोहली' असा गजर सुरु झाला. विराट कोहलीला 16000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ 1 धावसंख्येची गरज होती. त्याने मैदानात येताच पहिल्याच चेंडूवर दिमाखदार चौकार लगावला आणि या खास क्लबमध्ये आपली एन्ट्री निश्चित केली.

Virat Kohli Record
Virat Kohli: कोहलीचा 'विराट' शो फक्त टीव्हीवरच, स्टेडियममध्ये चाहत्यांना नो-एन्ट्री; 'विजय हजारे ट्रॉफी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

सचिन तेंडुलकरच्या 'स्पेशल क्लब'मध्ये विराटची एन्ट्री

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये (एकदिवसीय आणि देशांतर्गत 50 षटकांचे सामने) 16 हजार धावा करणे ही अत्यंत कठीण गोष्ट मानली जाते. आतापर्यंत भारतातून केवळ सचिन तेंडुलकरनेच (21,999 धावा) हा पराक्रम केला होता. आता विराट कोहली या यादीत सामील होणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. तर जागतिक स्तरावर पाहिल्यास लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावा पूर्ण करणारा विराट हा जगातील केवळ 9 वा फलंदाज आहे.

Virat Kohli Record
Virat Kohli: किंग कोहलीची बॅट 'फायर' मोडवर...! विराटच्या निशाण्यावर मोठा ऐतिहासिक रेकॉर्ड; सलग तिसरे वनडे शतक ठोकण्याची सुवर्णसंधी

'सर्वात वेगवान' फलंदाज

विराट कोहलीने (Virat Kohli) हा टप्पा गाठताना सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडीत काढला. सचिनने 16000 लिस्ट-ए धावा करण्यासाठी 391 डावांचा सामना केला होता. मात्र, विराटने हा भीमपराक्रम अवघ्या 330 डावांमध्ये पूर्ण केला. यामुळे पुरुषांच्या लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 16000 धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला.

Virat Kohli Record
Virat Kohli Six: वनडेत पहिल्यांदाच 'षटकार' मारुन उघडलं खातं, किंग कोहलीचा तूफानी पूल शॉट पाहून चाहतेही अचंबित; पाहा VIDEO

आंध्राचे दिल्लीसमोर 299 धावांचे आव्हान

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आंध्राच्या संघाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 298 धावांचा डोंगर उभा केला. आंध्राकडून रिकी भुईने 122 धावांची जबरदस्त शतकी खेळी खेळली. दिल्लीच्या गोलंदाजांनीही चोख प्रत्युत्तर दिले, ज्यात सिमरजीत सिंहने 5 गडी बाद करुन आंध्राच्या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न केला, तर प्रिन्स यादवने 3 बळी घेतले. विराट कोहलीचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. आता या विक्रमानंतर विराट एक मोठी खेळी खेळून दिल्लीला (Delhi) विजय मिळवून देतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com