Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

Goa Crime News: पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Crime News
Crime News
Published on
Updated on

Goa Crime News

पर्वरी येथे मंगळवारी (ता.५) रात्री ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत पर्वरी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून काही रोख रक्कम आणि सट्टेबाजीचे १० लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

पर्वरी येथील गौतम हॉटेलजवळील एका व्हिलामध्ये क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती पर्वरी पोलिसांना सूत्रांकडून मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने रात्री १० ते १ वा.च्या दरम्यान या व्हिलामध्ये छापा टाकला आणि लॅपटॉपचा वापर करून ऑनलाईन सट्टेबाजी करताना प्रवीणकुमार ठक्कर (३५), जॉनी ठक्कर (२४) आणि चेतनकुमार ठक्कर (३४) तिघेही पाटण-गुजरात येथील रहिवासी यांना पकडले.

पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही संशयितांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, जुगार विरोधी कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Excise Department liquor Seizure
Goa Online Financial Fraud
 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com