Goa Today's News: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता हटवली

Goa Today's 06 June 2024 live Updates: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या ताज्या घडामोडी.
Election Commission
Election CommissionDainik Gomantak

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता हटवली

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक आणि आंध्रप्रदेश, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली आदर्श आचारसंहिता हटवली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता कायम राहणार.

North Goa Police Operation Raakhan: उत्तर गोवा पोलिसांचे 'ऑपरेशन राखण', नववा दिवस

Goa Crime News: देवेंद्र गावकर हल्ला प्रकरण, दोघांविरोधात गुन्हा

देवेंद्र गावकर ( दावकोण- धारबांदोडा) यांच्यावर हल्ला करून जखमी केल्या प्रकरणी कुळे पोलिसांकडून संशयित कांता बेतकेकर (कणकीरे - गुळेली) व महादेव गावडे ( नाणूस- उसगाव) यांच्या विरुद्ध केला गुन्हा नोंद. कुळे पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत, खासदार श्रीपाद नाईक दिल्लीला जाणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक एनडीएच्या बैठकीसाठी आज (दि.०६ मे) दिल्ली रवाना होणार आहेत. शुक्रवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला सावंत आणि नाईक हजेरी लावतील.

Goa CM Pramod Sawant: 2027 व त्यानंतरही गोव्यात डबल इंजिन सरकार असेल - मुख्यमंत्री

केंद्रात एनडीए सरकार स्थापन होत असून येणाऱ्या काळात विकासाची गती अधिकच वाढणार आहे. गोव्यात आत डबल इंजिन सरकार आहे. ते येणाऱ्या २०२७ व नंतरही असेल, याबाबत कोणी शंका बाळगू नये.

काही घटकांनी लोकांच्या डोक्यात अनावश्यक वाईट विचार घालण्याचा प्रयत्न केला. तरीही समस्त गोमंतकीयांनी आणि खास करून, डिचोली तालुका, साखळीवासीयांनी भाजपवरील विश्वास मतदानातून दाखवून दिला - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa Assault Case: धावकोण धारबांदोडा येथील देवेंद्र गांवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

धावकोण धारबांदोडा येथील देवेंद्र गांवकर यांच्यावर बुधवारी पहाटे प्राणघातक हल्ला. हल्लेखोरांनी गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल व वीस हजार रोख घेऊन काढला पळ. देवेंद्र गांवकर याच्यावर फोंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु. कुळे पोलिसांत तक्रार दाखल, तपास सुरु.

Amboli Waterfall: आंबोली घाटात धबधबा परिसरात कोसळला भला मोठा दगड

आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भितीकडे जावून स्थिरावला. वस परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.

Siolim: सडयेत तणाव, सातेरी देवस्थानची जागा हडपण्याचा प्रयत्न

सडये-शिवोलीत श्री. सातेरी देवस्थानची जागा परप्रांतीय बिल्डरकडून हडप करण्याचा प्रयत्न. भाविकांमध्ये संताप. सडयेत तणाव.

Goa Fire Case: केळवाडा, पिर्णा येथे घराला आग

केळवाडा, पिर्णा येथे घराला आग. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल.

Youth Lost: दमणवाडा-शेळपे येथील युवक बेपत्ता, रात्रीपासून शोध

दमणवाडा केपे शेळपे येथील युवक बेपत्ता झाला असून, रात्रीपासून त्याचा शोध घेतला जात आहे.

Quepem-Xelpem
Quepem-Xelpem Dainik Gomantak

Shivrajyabhishek Din 2024 In Goa: डिचोलीत 351 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा उत्साह

छत्रपती शिवाजी महाराज की जय. डिचोलीत 351 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा उत्साह. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून शिवरायांना अभिवादन. देशाची सुराज्याच्या दिशेने वाटचाल-मुख्यमंत्री.

Bypass Road: व्हाळशी-डिचोली ते वाठादेवपर्यंतच्या चारपदरी बगलमार्गाचे लोकार्पण

Bypass Road
Bypass RoadDainik Gomantak

प्रतीक्षा संपली..!. व्हाळशी-डिचोली ते वाठादेवपर्यंतच्या महत्वाकांक्षी चारपदरी बगलमार्गाचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते लोकार्पण. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांचीही उपस्थिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com