Menkurem Bicholim Update Dainik Gomantak
गोवा

Menkurem Crime: तात्काळ आरोपींना अटका करा, अन्यथा आंदोलन करु; मेणकुरे प्रकरणात डिचोलीतील तलाठ्यांच्या इशारा

Menkurem Bicholim Update: डिचोली तालुक्यातील तलाठ्यांनी आजच्या आज आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे

Akshata Chhatre

मेणकुरे: डिचोली तालुक्यातील तलाठी मारहाण प्रकरणाबद्दल आता आणखीन एक मोठा खुलासा झाला आहे. सरकारी सेवा बजावत असताना मेणकुरे-धुमासे पंचायतीचे तलाठी फटगो पालकर (वय ४७, हरवळे) यांना मारहाण करण्यात आली होती.

या प्रकरणालाच धरून डिचोली तालुक्यातील तलाठ्यांनी डिचोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आजच्या आज ( गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर) रोजी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे आणि असे न झाल्यास पोलीस स्थानकाबाहेर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

मेणकुरे-धुमासे पंचायतीचे तलाठी फटगो पालकर त्यांचे काम करत असताना त्यांना मेणकुरे येथील संजय विष्णू नाईक आणि अशोक विष्णू नाईक यांनी अचानक मारहाण केल्याचा आरोप पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला होता.

मात्र दुसऱ्या बाजूने तलाठी फटगो पालकर आणि अमर अनंत नाईक यांनी एका महिलेसह मला आणि भावाला मारहाण केल्याची तक्रार अशोक विष्णू नाईक यांनी देखील दाखल केली होती. त्यांच्या म्हणनयनुसार तलाठी फटगो पालकर यांनी बेकायदेशीरपणे त्यांच्या जागेत प्रवेश केला होता.

तलाठी फटगो पालकर आणि अशोक विष्णू नाईक यांनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदवण्याने या प्रकरणाचा गुंता वाढला होता आणि पोलीस याचा तपास करत होते मात्र आता डिचोली तालुक्यातील तलाठयांनी पोलीस स्थानकात आरोपींच्या अटकेची मागणी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT