Bicholim Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: डिचोलीतील 'सेतू संगम'च्या सुरक्षेत त्रुटी, संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

Bicholim Crime News: शहरातील ‘सेतू संगम’ प्रकल्पस्थळी (सोमवारी) सकाळी एका साधारण ४६ वर्षीय परप्रांतीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: शहरातील ‘सेतू संगम’ प्रकल्पस्थळी (सोमवारी) सकाळी एका साधारण ४६ वर्षीय परप्रांतीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामुळे ‘सेतू संगम’च्या सुरक्षेत त्रुटी स्पष्ट होत आहेत. मृत व्यक्ती परप्रांतीय असून, तो भिकारी असल्याचे समजते.

सोमवारी सकाळी पालिकेचे स्वच्छता कामगार साफसफाई करण्यासाठी प्रकल्पस्थळी गेले असता, तेथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याजवळ हा मृतदेह असल्याचे आढळून आले. त्याच्या नाकातोंडातून रक्त आले होते. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यासंबंधी डिचोली पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेह डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेऊन नंतर शवचिकित्सा करण्यासाठी मृतदेह बांबोळीच्या ''गोमेकॉ''त पाठवला. या इसमाचा मृत्यू नेमका कसा झाला. ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र अति मद्यप्राशन केल्यामुळे तो झोपेत बाकट्यावरून खाली पडून त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अडीज वर्षांपूर्वी एका युवकाचा खून झाल्यानंतर या प्रकल्पस्थळी आता एक संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने ''सेतू संगम'' वरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुरवातीपासूनच ''श्रेय''वादात अडकलेल्या या प्रकल्पाची देखभाल करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाच्या सौंदर्याला सध्या समस्यांचे ग्रहण लागल्याचे आढळून येत आहे. आठ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम आणि जलस्रोत खात्याच्या सहकार्यातून येथील दोन्ही पुलांच्या मधोमधच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.

मात्र हळूहळू या प्रकल्पाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या वैभवात भर घालणारा ''सेतू संगम'' हा प्रकल्प म्हणजे भिकारी आणि मद्यपींचे आश्रयस्थान बनले आहे. बऱ्याचदा रात्रीच्यावेळी या प्रकल्पात भिकारी आश्रय घेत असतात. काहीजण मद्यप्राशन करून या प्रकल्पात झोपलेले आढळून येतात.

उपाययोजना करा

ऑगस्ट २०२३ मध्ये या प्रकल्पावर रमेश सिद्धागोळी या युवकाचा निर्दयीपणे खून करण्याची घटना घडली होती. या खून प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली होती. ज्या युवकाचा खून झाला आहे, तो युवक आणि मारेकरी रात्रीच्यावेळी या प्रकल्पस्थळी आसरा घेत होते,अशी माहिती त्यावेळी उघड झाली होती.

या घटनेनंतर प्रकल्पावरील भिकारी आणि मद्यपींच्या वावरावर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने भिकारी आणि मद्यपींसाठी हा प्रकल्प आश्रयस्थान बनल्याचे दिसून येत आहे. भविष्यात अनर्थ घडण्यापूर्वीच या प्रकल्पस्थळी सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT