Rain Canva
गोवा

Goa Rain : परतीच्या पावसाने 'अग्निशमन'ची तारांबळ! बार्देश, डिचोली, सत्तरीत झाडांची पडझड; पिकांचेही नुकसान

Goa Weather Update: विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या वादळी पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई, डिचोली: डिचोली, सत्तरी तालुक्यात सोमवारी संध्याकाळी झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, वीज खांब पडल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी नागरिकांची तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसापासून परतीचा पावसाचा फटका अनेक भागात बसला असून आज सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे झाडांची मोठी पडझड झाली. यात ब्रह्मकरमळी सत्तरी (Sattari) येथे प्रसाद खाडीलकर यांच्या घराजवळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक कोंडी झाली. घोलवाडा- खोतोडा येथे घरावर झाड पडून मोठे नुकसान झालेले आहे. मैंगीणी-गुळेली येथे सरकारी प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक कोंडी झाली.

तसेच साट्रे येथे पुलाजवळ झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला. खोतोडा-परवारवाडा येथे घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले. तसेच इतर भागात सुध्दा झाडे पडली. काही ठिकाणी झाडे वीज वाहिनीवर पडल्याने वीजपुरवठा बंद होता. यात वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केले. वाळपई अग्निशमन दलातर्फे झाडे पडलेल्या ठिकाणी धाव घेऊन मदत कार्य करण्यात आले आहे. उशिरापर्यंत जवानांचे मदत कार्य सुरू होते. वाळपई अग्निशमन अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदत कार्य केले.

भातशेतीसह इतर पिकांचेही नुकसान

गडगडाटासह सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाचा डिचोली परिसराला तडाखा बसला. साधारण अर्धा तास पर्जन्यवृष्टी झाली असली, तरी आजच्या पावसावेळी झाडांची पडझड झाली. सर्वण, कारापूर, आमोणेत झाडे पेडली. शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाचा धसका घेतला असून भातशेतीसह इतर पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आजच्या पावसावेळी काही भागात सौम्य वादळही होऊन वाठादेवसह काही भागात झाडांची पडझड झाली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. सायंकाळी झालेल्या पर्जन्यवृष्टीवेळी जनजीवनावर काहीसा परिणाम झाला.

डिचोलीतील काही भागातील अपवाद वगळता भातशेती अजूनतरी पूर्णपणे पिकलेली नाही. त्यामुळे आजच्या पावसाचा भातशेतीवर विशेष परिणाम झालेला नाही. परंतु अशा रोज पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान होईल, असे मत येॆथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले. भातशेती पिकायच्या ऐनवेळी पावसाचा तडाखा चालूच राहिल्यास भातशेती आडवी होण्याची शक्यता आहे.

बार्देश तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड; वीज खंडित

सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या वादळी पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. तसेच गिरी मार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ तेथील वाहतूक खोळंबली होती. म्हापसा, पर्वरी व पिळर्ण अग्निशमन दलाकडे एकूण पडझडीचे १८ कॉल्स नोंद झाले. यात एकट्या दलाच्या म्हापसा स्टेशनमध्ये १५ कॉल्स नोंद झाले होते. अंदाजे दीड तास कोसळलेल्या या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. पडझडीमुळे अनेक भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता.

नायकावाडा- हळदोणा, पुनोळा- उसकई, खोर्जुवे, वान्सिओवाडा-गिरी, ग्रीन पार्क जंक्शन गिरी, खोप्रेभाट- नास्नोळा, जागबाई मंदिरजवळ - उसकई, पेलोवाडा उसकई, हळदोणा, खोर्जुवे पुलाजवळ, पावलू गॅरेजजवळ आल्तीनो म्हापसा, मयडे चर्चजवळ, पर्वरी शैक्षणिक भवन, पैठण व शांतादुर्गा मंदिर जवळ सांगोल्डा या ठिकाणी रस्त्यावर तसेच वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. वेर्ला येथे आनंद वायंगणकर यांच्या घरावर माड, खोर्जुवे येथे हळदणकर यांच्या घरावर झाड कोसळले. शिवाय पर्रा येथे आल्वामारजवळ माड कोसळल्याने दोन चारचाकी व एका दुचाकीचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे जवान ही झाडे कापण्याच्या कामात गुंतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT