Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!

राज्यात परतीच्या पावसानं धूमाशान घातलंय. सोमवारी (ता. 7) सायंकाळी परतीच्या पावसानं सत्तरी, डिचोलीला अक्षरश: झोडपून काढलं.
Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात परतीच्या पावसानं धूमाशान घातलंय. सोमवारी (ता. 7) सायंकाळी परतीच्या पावसानं सत्तरी, डिचोलीला अक्षरश: झोडपून काढलं. हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' वर्तवण्यात आला होता. सत्तरी, डिचोलीत विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे डिचोली, सत्तरीत बत्ती गुल झाली आहे.

सत्तरीत पावसाचा तडाखा!

सत्तरीतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच, वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे. एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मकरमळी, खोतोडा आणि इतर भागात मोठ्याप्रमाणात झाडांची पडझड झाली आहे.

Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!
Goa Rains: रेकॉर्डब्रेकिंग पावसानंतर गोव्याला दिलासा मिळण्याची शक्यता

डिचोलीत परतीच्या पावसाचं धूमशान!

तसेच, डिचोलीतील अनेक भागात विजांच्या गडगडाटांसह पावसानं धूमशान घातलं. डिचोलीत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळले आहेत, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com