Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मध्यरात्री 'ड्रग्ज'प्रकरणी युवकाला अटक, 228 ग्रॅम गांजासह स्कूटर-मोबाईल जप्त; शिरगावात कारवाई

Bicholim Police Drug Raid In Goa: डिचोली पोलिस सध्या ‘ऍक्शन मोड’मध्ये असून, पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे.

Sameer Amunekar

डिचोली: डिचोली पोलिस सध्या ‘ऍक्शन मोड’मध्ये असून, पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत काल मध्यरात्री शिरगाव येथे कारवाई करुन पोलिसांनी एका स्थानिक युवकाला ‘गांजा’सह रंगेहाथ पकडले आहे.

मंगळवारी मध्यरात्री शिरगाव येथे केलेल्या कारवाईत तेथीलच २६ वर्षीय प्रजल शंभू गावकर या युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२८ ग्रॅम गांजा तसेच स्कूटर आणि मोबाईल जप्त केला आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात डिचोली पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अमली पदार्थ विरोधी कारवाई करुन चार युवकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

तिघेजण स्थानिक आहेत. या कारवाई पाहता डिचोलीत ‘ड्रग्ज’चा विळखा पसरला असल्याचे धोक्याचे संकेत मिळत आहेत. या बेकायदा व्यवसायात अन्य काहीजण असू शकतात. अशी शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करीत आहेत. संशयित युवक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाली आहे.

तीन दिवस पोलिस कोठडी!

संशयित गांजाच्या व्यवहारासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच, पोलिसांनी शिरगाव येथील रेल्वे ट्रॅकवर सापळा लावला होता. त्यात संशयित प्रजल फसला गेला.

पोलिसांनी प्रजल याला अटक करुन त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयित युवकाला आज (बुधवारी) न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT