Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim: कच्च्या कैऱ्या होताहेत 'गोड', डिचोलीत आवक वाढली; पोषक हवामानामुळे आंब्यांचा बहर यंदाच्या मोसमात समाधानकारक

Bicholim Market: यंदा आंब्यांना समाधानकारक बहर आल्याने बाजारात कच्च्या कैऱ्यांची आवक वाढत असून, बाजारात कैऱ्यांना मागणीही वाढली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: यंदा आंब्यांना समाधानकारक बहर आल्याने बाजारात कच्च्या कैऱ्यांची आवक वाढत असून, बाजारात कैऱ्यांना मागणीही वाढली आहे. आवक वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कैऱ्या काहीशा ‘गोड’ झाल्या आहेत.

गेल्या दोन आठवडी बाजाराच्या तुलनेत बुधवारी डिचोलीत कैऱ्यांची आवक वाढली होती. आवक वाढल्याने कैऱ्यांचे दरही आता कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात ४०० ते ५०० रुपये शंभर या दराने कैऱ्या विकण्यात येत होत्या. आता हेच दर २००ते ३०० रुपयांवर आले आहेत.

पुढील आठवड्यापर्यंत बाजारात कैऱ्यांची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे संकेत एक विक्रेते पुनाजी गवस यांनी दिले आहेत. गेल्या दोन-तीन आठवडी बाजारात कैऱ्या उपलब्ध होत आहेत. गेल्या आठवड्यापासून आवक वाढली आहे. आहारातील एक घटक असलेल्या कच्च्या कैऱ्या खळात घालतानाच लोणचे आदी पदार्थ बनविण्यात येतात.

सीमेलगतच्या भागातून कैऱ्या

स्थानिक भागांसह महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागातून कच्च्या कैऱ्या आज डिचोलीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या होत्या. बाजारात कैऱ्या २००ते ३०० रुपये शंभर नग या दराने विकण्यात येत होत्या.

संतुलित हवामानामुळे यंदा आंबा लागवड बहरली आहे. त्यामुळे कच्च्या कैऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पुढील आठवड्यात कैऱ्यांची आवक आणखीन वाढणार. असे महाराष्ट्रातील माटणे येथील एक विक्रेते पुनाजी गवस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT