T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Rahkeem Cornwall T20 Double Century: 140 किलो वजन आणि 6 फूट उंची असलेल्या या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली.
Rahkeem Cornwall T20 Double Century
Rahkeem Cornwall Dainik Gomantak
Published on
Updated on

Rahkeem Cornwall T20 Double Century: क्रिकेटच्या मैदानावर दररोज नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित होतात आणि जुने रेकॉर्ड मोडीत निघतात. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात काही रेकॉर्ड असे असतात, जे मोडणे कोणत्याही खेळाडूसाठी जवळजवळ अशक्य वाटते. असाच एक अविश्वसनीय पराक्रम वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज रहकीम कॉर्नवाल याने करुन दाखवला. 140 किलो वजन आणि 6 फूट उंची असलेल्या या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली. फिटनेसच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या कॉर्नवालने आपल्या विस्फोटक फलंदाजीने हे सिद्ध केले की, टॅलेंट कोणत्याही वजनावर मात करु शकते.

रहकीम कॉर्नवालने ही ऐतिहासिक खेळी अटलांटा ओपन टी-20 लीगमध्ये खेळताना साकारली. त्याने अवघ्या 77 चेंडूंमध्ये 205 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 266.23 इतका प्रचंड होता. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंनाही आजवर जे जमले नाही, ते कॉर्नवालने अमेरिकेतील या लीगमध्ये करुन दाखवले.

त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने म्हणजेच 'अटलांटा फायर'ने निर्धारित 20 षटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात 326 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिस्पधी संघाला या धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली आणि कॉर्नवालच्या संघाने हा सामना 172 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

Rahkeem Cornwall T20 Double Century
Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

कॉर्नवालच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वजन. सामान्यतः क्रिकेटमध्ये (Cricket) चपळतेला महत्त्व दिले जाते, परंतु 140 किलो वजन असूनही कॉर्नवालने ज्या पद्धतीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला, ते पाहून क्रीडा रसिक थक्क झाले. या एका खेळीमुळे कॉर्नवाल रातोरात जगभरात प्रसिद्ध झाला. त्याच्या या फलंदाजीने हे दाखवून दिले की, मैदानावर चेंडू सीमापार धाडण्यासाठी केवळ धावण्याची गरज नसते, तर मनगटातील ताकदही पुरेशी असते.

Rahkeem Cornwall T20 Double Century
Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

रहकीम कॉर्नवाल हा केवळ लीग क्रिकेटपुरता मर्यादित खेळाडू नाही, तर त्याने वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व देखील केले. तो वेस्ट इंडिजच्या (West Indies) कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग राहिला. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 10 सामने खेळले असून 17 डावांमध्ये 18.64 च्या सरासरीने 261 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शानदार अर्धशतकांची नोंद आहे. फिरकी गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर तो उपयुक्त ठरला आहे. मात्र, टी-20 मधील त्याचे हे द्विशतक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक म्हणून कायम लक्षात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com