

पेडणे: पेडणे येथील मासळी मार्केट सध्या सिंधुदुर्ग, बार्देश, मडगाव आणि कारवार येथून येणाऱ्या ताज्या मासळीमुळे गजबजून गेले आहे. राज्यात मासेमारी बंदी जवळ आल्याने मत्स्यखवय्ये मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असून सकाळपासूनच ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.
पेडणे मासळी मार्केटमध्ये महिला आणि पुरुष मिळून सुमारे ३५ विक्रेते व्यवसाय करतात. येथे मासळीचा वाटा अवघ्या ५० रुपयांपासून सुरू होत असल्याने सामान्य ग्राहकांनाही विविध प्रकारची मासळी खरेदी करणे शक्य होते. विशेषतः सिंधुदुर्गातून येणारी मासळी अधिक ताजी आणि दर्जेदार मानली जात असल्याने ग्राहकांकडून तिला मोठी पसंती मिळत आहे.
बांगडे, सुरमई, कोळंबी, तारले, पापलेट यांसह विविध प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध होत असून सकाळच्या वेळेतच मोठ्या प्रमाणावर विक्री होते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान, पालिका प्रशासनाकडून प्रस्तावित मासळी मार्केट प्रकल्प अद्याप रखडलेलाच असल्याने विक्रेते आणि ग्राहकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि जागेची कमतरता यांसारख्या समस्या कायम असून आधुनिक मासळी मार्केट उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.