Sameer Panditrao
गोव्यात गर्दीपासून दूर असलेला, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा सगळेच शोधात असतात.
उत्तर गोव्यातील गजबजलेल्या किनाऱ्यांपेक्षा झालोर बीच खूपच शांत आहे. येथे पर्यटकांची संख्या कमी असल्याने खासगीपणाचा अनुभव मिळतो.
झालोर बीचची वाळू स्वच्छ आणि पांढरी असून समुद्राचे पाणी निळसर व स्वच्छ आहे. येथे पोहणे तुलनेने सुरक्षित मानले जाते.
किनाऱ्यालगत असलेली नारळाची झाडे, वाळूचे ढिगारे आणि मोकळे वातावरण या बीचच्या सौंदर्यात भर घालतात.
संध्याकाळी झालोर बीचवर दिसणारा सूर्यास्त अत्यंत सुंदर असतो. फोटोग्राफी आणि शांत फेरफटक्यासाठी हा वेळ सर्वोत्तम आहे.
किनाऱ्यावरील निवडक शॅक्समध्ये गोवन सीफूडचा आस्वाद घेता येतो. इच्छुक पर्यटक स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारीचाही अनुभव घेऊ शकतात.
हा किनारा दक्षिण गोव्यात वार्का किनाऱ्याजवळ आहे. मोपा विमानतळापासून हा ८० किमी लांब आहे.
गोव्यातील 'हा' किनारा आहे वेगळ्या कारणामुळे प्रसिद्ध