Bicholim Waste Issue Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीवर धोक्याची टांगती तलवार! ग्राहकांमध्ये चिंता, रोगराई फैलावण्याची भीती; काय आहे कारण? वाचा..

Bicholim Waste Issue: ''स्वच्छ आणि सुंदर शहर'' अशी ओळख असलेल्या डिचोलीत भर बाजाराजवळ पुन्हा एकदा शहाळ्यांच्या करवंट्या टाकण्याचे प्रकार वाढले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: ''स्वच्छ आणि सुंदर शहर'' अशी ओळख असलेल्या डिचोलीत भर बाजाराजवळ पुन्हा एकदा शहाळ्यांच्या करवंट्या टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या बाजाराजवळ शहाळ्यांच्या करवंट्यांचा मोठ्या प्रमाणात खच पडल्याचे आढळून येत असून, हा कचरा म्हणजे डेंग्यू आदी जीवघेण्या रोगराईला आमंत्रणाचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी मे महिन्यात याचठिकाणी मोठ्या प्रमाणात शहाळ्यांच्या करवंट्यांचा खच पडला होता. त्यावेळी दै. ''गोमन्तक'' मधून या समस्येला वाचा फोडल्यानंतर पालिकेला खडबडून जाग आली होती.

पालिकेने त्वरित पावले उचलताना शहाळ्यांच्या करवंट्यांची विल्हेवाट लावून परिसर चकाचक केला होता. त्यानंतर शहाळ्यांच्या करवंट्या टाकण्याचे प्रकार बंद झाले होते. मात्र आता पुन्हा हे प्रकार घडू लागल्याने बाजारातील व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दीड वर्षांपूर्वी शहरासह बाजार परिसरात डेंग्यूने थैमान घातले होते. मात्र आता शहाळ्यांच्या करवंट्यांमुळे पुन्हा एकदा रोगराईची भीती व्यक्त होत आहे.

पालिका इमारतीच्या मागच्या बाजूने आणि मासळी मार्केटला टेकून बाजारातील मोकळ्या जागेत सध्या मोठ्या प्रमाणात शहाळ्यांच्या करवंट्यांचा खच पडला आहे. सध्या या परिसरात गेल्यास मोठ्या प्रमाणात करवंट्यांच्या कचराच दिसून येत आहे. शहाळी विक्रेते या करवंट्या भर बाजाराजवळ टाकतात.

या करवंट्यांमुळे डासांची पैदासही वाढली आहे. या करवंट्या वेळीच काढल्या नाहीत, तर बाजारात भयानक समस्या निर्माण होताना रोगराईला आमंत्रण ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संध्याकाळच्यावेळी तर डासांचा उपद्रव वाढला आहे. येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त करावा, अशी मागणी बाजारातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT