Bicholim: सणासुदीच्या हंगामात विड्याच्या पानांना आलाय भाव! विड्याच्या पानांचे दर दुप्पट; हळदी-कुंकू उत्सवामुळे मागणीत वाढ

Betel leaf price hike: अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या विड्याच्या पानांना सध्या ''अच्छे दिन'' आले आहेत. बाजारात ही पाने दुप्पटीने वाढली असून, सध्या बाजारात १५० ते १६० रुपये शंभर असा या पानांचा दर आहे.
Goa Market Prices
Goa Market PricesDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या विड्याच्या पानांना सध्या ''अच्छे दिन'' आले आहेत. बाजारात ही पाने दुप्पटीने वाढली असून, सध्या बाजारात १५० ते १६० रुपये शंभर असा या पानांचा दर आहे. आतापर्यंत विड्याच्या पानांची एवढी दरवाढ कधीच झाली नव्हती. आत्तापर्यंत जास्तीत जास्त १०० रुपये एवढी दरवाढ झाली होती.

गेल्या महिन्यात तर ८० रुपये १०० याप्रमाणे विड्याच्या पानांचे दर होते. अशी माहिती पान विक्रेत्यांकडून उपलब्ध झाली आहे. तुटवड्यामुळे विड्याची पाने महाग झाली आहेत. असा विक्रेत्यांचा दावा आहे. तर सध्या हळदीकुंकूची धामधूम सुरु असून, या पानांना बाजारात प्रचंड मागणी आहे.

Goa Market Prices
Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

हीच संधी साधून विक्रेत्यांनी दरवाढ केली असून, त्यामुळेच विड्याच्या पानांचा भाव वाढला आहे. असे ग्राहकांचे म्हणणे आहे. देवकार्य आदी शुभकार्यासाठी विड्याची पाने प्राधान्यक्रमाने आवश्यक आहेत.

Goa Market Prices
Bitter Gourd Leaves Benefits: कारलेच नाहीतर त्याची पानेही फायदेशीर; मधुमेहींसाठी रामबाण उपाय

हिंदू धर्मात देवकार्यावेळी महत्वाचे स्थान असलेल्या पानांचा विडा ठेवल्याशिवाय कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करत नाहीत. विड्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने बहुतेकजण या पानांचा जेवल्यानंतर खाण्यासाठी वापर करतात. त्यामुळे ही विड्याची पाने दैनंदिन गरज बनली आहे.

Goa Market Prices
Mint Leaves: सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पान खा, दिवसभर ऊर्जावान व फ्रेश राहाल

तूर्त दर घटण्याची शक्यता कमीच

डिचोलीच्या बाजारात कर्नाटकमधील ‘निपाणी’ येथून तसेच आंध्रप्रदेश मधून विड्याच्या पानांची आवक होत असते. मात्र सध्या डिचोलीत या पानांचा तुटवडा दिसून येत आहे. सध्या निपाणी येथून पानांची आवक कमी झाली आहे.

सध्या उत्पादन कमी होत असल्याने विड्याच्या पानांची आवक घटली आहे, असे बाजारातील अब्दुल या विक्रेत्याने सांगितले आहे. चालू जानेवारी महिना संपेपर्यंत विड्याची पाने स्वस्त होण्याची चिन्हे कमीच आहेत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com