Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

Man Flying With Tin Shed Video: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात बुधवारी (13 मे) निसर्गाच्या कोपाचे एक अत्यंत भयावह दृश्य पाहायला मिळाले.
Man Flying With Tin Shed Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Bareilly Storm Viral Video: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात बुधवारी (13 मे) निसर्गाच्या कोपाचे एक अत्यंत भयावह दृश्य पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये वादळी पावसाने मोठे नुकसान केले. ताशी 70 किलोमीटर वेगाने आलेल्या या वादळाने उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांत 50 हून अधिक लोकांचा बळी घेतला असून, शेकडो झाडे आणि वीजेचे खांब उन्मळून पडले आहेत. या सर्व घटनांमध्ये बरेलीच्या भमोरा क्षेत्रातील बबियाना गावात घडलेली एक घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, जिथे एक व्यक्ती टिनशेडसह चक्क हवेत उडताना दिसली.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी दुपारी भमोरा परिसरात अचानक जोरदार वादळ सुरु झाले. गावातील एका मंगल कार्यालयाचे टिनशेड वाऱ्याच्या वेगवान झोक्यांमुळे उडू लागले. हे टिनशेड वाचवण्यासाठी 50 वर्षीय नन्हें अन्सारी यांनी त्याला बांधलेली दोरी घट्ट पकडून ठेवली होती. मात्र, वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की नन्हें अन्सारी टिनशेडसह हवेत फेकले गेले. ते सुमारे 50 ते 80 फूट अंतरापर्यंत हवेत उडाले आणि शेजारच्या शेतात जावून कोसळले. या थरारक अपघातात सुदैवाने अन्सारी यांचा जीव वाचला असला, तरी त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला असून तो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल, अशी स्थिती आहे.

Man Flying With Tin Shed Video
Viral Video: वंदे भारत बनली 'भाजी मंडई'! 700 रुपयांचे तिकीट 380 मध्ये विकणाऱ्या टीटीईचा 'स्टिंग ऑपरेशन'ने पर्दाफाश; रेल्वेकडून तत्काळ निलंबन

स्वतः अन्सारी यांनी या अनुभवाबद्दल सांगितले की, त्यांना वादळाच्या तीव्रतेचा अजिबात अंदाज आला नव्हता. वाऱ्याने त्यांना इतक्या उंचावर उचलले होते की डोळ्यासमोर सर्व काही धुसर झाले होते. जेव्हा हातातील दोरी निसटली, तेव्हा ते थेट जमिनीवर कोसळले. अन्सारी जमिनीवर पडताच स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Man Flying With Tin Shed Video
Viral Video: अजब तुझा कारभार! स्कूटीवर ठेवली दुसरी स्कूटी, तरुणीचा जीवघेणा जुगाड; सोशल मीडियावर अतरंगी व्हिडिओचा धुमाकूळ

वादळाचे हे संकट केवळ मालमत्तेपुरते मर्यादित राहिले नाही. भमोरा क्षेत्रातीलच हर्रामपुर गावात एका निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला. सातवीत शिकणारी देवकी सक्सेना ही मुलगी दुपारी 12 च्या सुमारास बागेत गेली होती. वादळ सुरु झाल्यावर स्वतःचा बचाव करण्यासाठी ती एका आंब्याच्या झाडाखाली उभी राहिली. दुर्दैवाने, वाऱ्याच्या जोराने तेच झाड देवकीच्या अंगावर कोसळले, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. बरेलीतील या दोन टोकाच्या घटना वादळाच्या भीषण वास्तवाची जाणीव करुन देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com