Shakib Al Hasan: क्रिकेटविश्वात खळबळ! 'त्या' हत्येच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 1 कोटींची मागणी, शाकिब अल हसनचा खळबळजनक दावा

Shakib Al Hasan Extortion News: बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन सध्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादामुळे अधिक चर्चेत आहे.
Shakib Al Hasan murder allegation
Shakib Al Hasan murder allegationDainik Gomantak
Published on
Updated on

Bangladesh Murder Case: बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन सध्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादामुळे अधिक चर्चेत आहे. शाकिबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक खुलासा केला असून त्याच्यावर लावण्यात आलेले हत्येचे आरोप हटवण्यासाठी त्याच्याकडे 1 कोटी टका (बांगलादेशी चलन) इतकी खंडणी मागण्यात आली असल्याचे त्याने म्हटले.

ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात (Bangladesh) झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका सरकारी कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी शाकिबवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. जमावाला हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याच गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी याचिकाकर्त्याने मध्यस्थांमार्फत ही मोठी रक्कम मागितली होती.

Shakib Al Hasan murder allegation
Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

शाकिबने स्पष्ट केले की, हे आरोप मागे घेण्यासाठी त्याला काही मध्यस्थांची नावे सांगण्यात आली होती. मात्र, त्याने हे पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. शाकिबच्या मते, जर त्याने पैसे दिले असते तर त्याचा अर्थ असा झाला असता की त्याने तो गुन्हा केला आहे किंवा त्यात त्याचा हात आहे. "मी पैसे का देऊ? जेव्हा मी काही केलंच नाही, तर पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कदाचित माझ्याकडे खूप पैसा आहे असं समजून त्यांनी ही मागणी केली असावी," अशा शब्दांत शाकिबने आपली भूमिका मांडली. तसेच, जेव्हा ही मागणी करण्यात आली तेव्हा गुन्हा आधीच नोंदवला गेल्याची माहिती त्याला नव्हती, त्यामुळे आता पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय नाव हटवणे सोपे नाही, याची जाणीवही त्याने बोलून दाखवली.

Shakib Al Hasan murder allegation
Bangladesh Violence: बांगलादेशात 'हिंदू' निशाण्यावर! डिसेंबर महिन्यात 12 जणांचा बळी; हत्यांमागे नियोजित कट?

शाकिबच्या क्रिकेटमधील भविष्याबाबतही आता मोठी अनिश्चितता निर्माण झाली. त्याने 1 ऑक्टोबर 2024 रोजी कानपूरमध्ये भारतांविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याने मायदेशात निवृत्तीचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त करत आपल्या निर्णयावरुन यू-टर्न घेतला होता. मात्र, सध्या तो कसोटी आणि टी-20 या दोन्ही फॉरमॅटमधून अधिकृतपणे निवृत्त झालेला नाही.

शाकिबने मुलाखतीत सांगितले की, जर त्याच्यावर लादलेली प्रवासबंदी उठवली गेली आणि त्याला आवश्यक सुरक्षा पुरवण्यात आली, तरच तो बांगलादेशात परतण्याचा विचार करु शकतो. हत्येच्या प्रकरणासह शाकिबवर बांगलादेशात एकूण तीन खटले दाखल आहेत, ज्यामुळे त्याचे पुन्हा मायदेशात परतणे सध्या कठीण दिसत आहे.

Shakib Al Hasan murder allegation
Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

या सर्व प्रकरणांमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि शाकिब यांच्यातील संबंधांवरही परिणाम झाला. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला शाकिब सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून त्याला गंभीर कायदेशीर लढा द्यावा लागत आहे. एका बाजूला बांगलादेश क्रिकेटला त्याची गरज असताना, दुसरीकडे त्याच्यावर असलेले गंभीर गुन्हेगारी आरोप आणि त्यात आता समोर आलेले खंडणीचे प्रकरण यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. शाकिब पुन्हा बांगलादेशच्या जर्सीत मैदानात दिसेल की नाही, याचे उत्तर आता केवळ तिथल्या राजकीय आणि कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com