Bicholim Fish Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim Fish Market : ..अन्‌ गावठी मासे महाग; खवय्यांना परवडेनात

सुंगटे 200रुपये वाटा : दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांची बाजाराकडे पाठ

गोमन्तक डिजिटल टीम

मासेमारी बंदीमुळे सध्या समुद्रातील मासळीचा तुटवडा निर्माण झाला असून, मासळी महाग झाली आहे. सध्या गावठी मासळीचे दिवस असले, तरी ही मासळी सामान्य मत्स्यप्रेमी खवय्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. डिचोलीच्या मासळी मार्केटमध्ये गावठी मासळीसह समुद्रातील मासे अजूनही उपलब्ध होत असले, तरी मासळीचे प्रमाण कमी झाले आहे.

दुसऱ्या बाजूने गावठीसह समुद्रातील मासळी महाग झाल्याने सामान्य लोकांनी मासळी मार्केटकडे पाठ केली आहे. मासळी मार्केटमध्ये पूर्वीसारखी नियमित गर्दी होत नाही. सध्या लहान सुंगटे, तारले 200 रुपये वाटा, तर कोळंबी, शिणाने, कोळंबी, काळुंदरे, सुरमई आदी मासळी 400 ते 600 रुपये किलो या दराने तर गावठी मासे 500 रुपये वाटा याप्रमाणे विकण्यात येत आहेत.

गावठी मासळीला तेजी

सध्या गावठी मासळीचे दिवस आहेत. डिचोलीत मोठ्या प्रमाणात नसली, तरी मये, चोडण आदी ठराविक भागातून गावठी मासळी उपलब्ध होत आहे. सुंगटे, शेवटे, काळंदुरे आदी ठरावीक प्रकारची गावठी मासळी बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहे. कमीतकमी ५०० रुपये वाटा, याप्रमाणे गावठी मासळी विकण्यात येते. गावठी मासळीचे दर ऐकताच मत्स्यप्रेमी खवय्यांच्या कपाळाला आट्या पडतात. सामान्य मत्स्यप्रेमी खवय्यांवर तर नको ती गावठी मासळी, अशी म्हणण्याची पाळी येते.

मासळीबाबत प्रश्नचिन्ह : खोल समुद्रात मासेमारीसाठी बंदी आहे. तरीसुद्धा डिचोलीच्या मासळी बाजारात अजूनही बांगडे, कोळंबी, सुरमई, तारले आदी समुद्रातील मासळीची मोठ्या प्रमाणात नसली, तरी नियमित आवक होत आहे. मासेमारीसाठी बंदी असताना ही मासळी कोठून उपलब्ध होते, त्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर मार्केटात उपलब्ध होणारी मासळी ताजी असते. असा दावा मासेविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

विविध प्रकारची मासळी उपलब्ध होत आहे. सामान्य लोकांना तर मासळी आवाक्याबाहेर झाली आहे. मासळी मार्केटात पाय ठेवावा की नाही, त्याबाबत शंभरवेळा विचार करण्याची पाळी येते.

मदन माशेलकर, ग्राहक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT