Bicholim Goa Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : सरकारी जागेतील अतिक्रमण जमीनदोस्त करणारच : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Bicholim News : आज (बुधवारी) कुंभारवाडा-मये येथील श्री सातेरी मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सनदांचे वितरण करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, सरकारी जमिनींवर अतिक्रमण करण्याचा विचारही करू नका, तर या जमिनी गावच्या विकासासाठी राखून ठेवा. सरकारी जमिनींवर बांधकामे केल्यास कारवाई अटळ आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे बोलताना केला.

मयेतील जनतेला शेतजमिनींचा मालकी हक्क मिळावा,यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतजमिनींची सनद मिळवता यावी, यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करणार, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

स्थलांतरीत मालमत्तेच्या वादात अडकलेल्या मयेतील आणखी २१५ जणांना घरांचा मालकी हक्क प्राप्त झाला आहे. या लोकांना सनद वितरीत करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. आज (बुधवारी) कुंभारवाडा-मये येथील श्री सातेरी मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सनदांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर आणि महेश सावंत, सरपंच विद्यानंद कारबोटकर, स्थानिक पंच दिलीप शेट, मये भू-विमोचन समितीचे सखाराम पेडणेकर आणि प्रेमानंद महांबरे उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी मये प्रश्‍नी खास कायदा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घातले. प्रक्रिया सुलभ केल्यानेच मयेतील जनतेला सनदांचा मार्ग मोकळा झाला आहे, असे शेट यांनी सांगितले.

शेतजमिनींचा मालकीहक्क मिळावा, त्यासाठी घरांप्रमाणेच दस्तऐवज प्रक्रिया सुटसुटीत करावी. सहाऐवजी एक कागदपत्र सादर करण्याची मुभा द्यावी.

सनदी कायद्याच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी केली. नागरिकांच्या अनास्थेमुळे अजूनही १९६ अर्ज प्रलंबित आहेत, अशी खंतही आमदार शेट यांनी व्यक्त केली. कार्यालयीन कामकाज हाताळून सनद विषय व्यवस्थित हाताळल्याबद्दल उपजिल्हाधिकारी कासकर यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT