Bicholim accident today Dainik Gomantak
गोवा

Bicholim: दुर्दैवी! 3 ऱ्या मजल्यावरती गेला तोल, कामगार कोसळला खाली; कर्नाटकातील मजुराचा अपघाती मृत्यू

Karnataka worker death: बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने राजासाब गुडीहोल (३८, रा. मूळ गदग, कर्नाटक) या मजुराला दुर्दैवाने जागीच मरण आले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने राजासाब गुडीहोल (३८, रा. मूळ गदग, कर्नाटक) या मजुराला दुर्दैवाने जागीच मरण आले.

ही घटना (शुक्रवारी) सकाळी शहरातील व्हाळशी येथील सरकारी ‘आयटीआय’पासून काही अंतरावर घडला. हा मजूर गेल्या काही वर्षांपासून मजुरीनिमित्त डिचोलीत राहत होता. त्याच्या मागे पत्नी आणि तीन लहान मुले आहेत.

यासंबंधीची माहिती अशी की, राजासाब नेहमीप्रमाणे सकाळी बांधकामस्थळी काम करीत असता, अचानक त्याचा तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. लागलीच इतर कामगार आणि अन्य काहींनी उपचारासाठी त्याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठविला.

प्राप्त माहितीनुसार राजासाबवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात मये परिसरात इमारतीवरून पडल्याने अन्य एक मजूर मृत्युमुखी पडला होता, अशी माहिती आजच्या घटनेनंतर समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

Bangladesh Violence: बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांचं पाशवी कृत्य! हिंदू कुटुंबावर हल्ला करुन घर दिलं पेटवून; जीव वाचवण्यासाठी धडपड VIDEO

Pooja Naik: 'पूजा नाईक' प्रकरणावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी! 26 लाखांचा गुन्हा 17 कोटींवर कसा गेला? सरदेसाईंच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

SCROLL FOR NEXT