Zubeen Garg Death
Zubeen Garg DeathDainik Gomantak

Zubeen Garg Death: गायक झुबीन गर्गचा मृत्यू स्कूबा डायव्हिंगमुळे नव्हे तर 'या' कारणामुळे, पत्नीनं केला धक्कादायक खुलासा Watch Video

Singer Zubeen Garg Death: १९ सप्टेंबर रोजी लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या अचानक निधनाने संपूर्ण देश हादरून गेला.
Published on

१९ सप्टेंबर रोजी लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या अचानक निधनाने संपूर्ण देश हादरून गेला. सुरुवातीच्या वृत्तांमध्ये झुबिन यांचा मृत्यू सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान झाला असल्याचे सांगण्यात आले होते. काही माध्यमांतून तर त्यांनी कदाचित लाईफ जॅकेट घातले नसेल, अशीही माहिती पुढे आली होती. मात्र या सर्व दाव्यांचे खंडन स्वतः झुबिन यांची पत्नी गरिमा सैकिया यांनी केले आहे.

गरिमानं स्पष्ट केलं की, झुबिन आपल्या काही जवळच्या मित्रांसोबत आणि बँड सदस्यांसह सिंगापूरमधील एका बेटावर गेला होता. ड्रमर शेखर आणि सिद्धार्थदेखील त्यांच्यासोबत होते. सर्वांनी पाण्यात उतरताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले, लाईफ जॅकेटही घातले होते. मात्र, त्यानंतर झुबिन पुन्हा एकदा पाण्यात गेला आणि त्याच क्षणी त्यांना अचानक स्ट्रोक आला.

गरिमा यांनी सांगितले की, “झुबिनला स्ट्रोक येण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधीही त्यांना अशाच समस्या झाल्या होत्या, पण त्या वेळी तातडीने उपचार मिळाल्यामुळे धोका टळला होता. यावेळी मात्र नशीबाने साथ दिली नाही.”

Zubeen Garg Death
Goa History: गोवा मुक्तीसाठी कुख्यात डाकू 'मानसिंह'ची धडपड! पोर्तुगीजांना हाकलण्यासाठी भारत सरकारला लिहिलं होतं पत्र, वाचा संपूर्ण कहाणी

झुबिनला ताबडतोब त्यांच्या मित्रांनी सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेले. सुमारे दोन तास आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार झाले, मात्र सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

झुबिन गर्ग हा केवळ आसामचाच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक होते.

Zubeen Garg Death
Omkar elephant Goa: तांबोसेतील मळ्यात 'ओंकार हत्ती'चे बस्तान! बागायतीचे नुकसान सुरूच; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

हिंदी, आसामी, बंगाली आणि नेपाळीसह तब्बल ४० हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या भावपूर्ण आवाजामुळे त्यांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली. आसाममधील संगीतसृष्टीत त्यांना "आयकॉन" म्हणून ओळखले जात होते.

ते २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या चौथ्या ईशान्य भारत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी सिंगापूरला गेले होते. पण त्याआधीच त्यांच्या आयुष्याचा धागा तुटला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण आसामसह देशभरातील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर हजारो चाहत्यांनी भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com