Bicholim Garden Dainik Gomantak
गोवा

Bicholim Garden: सापांचा वावर, झोपाळे गायब; डिचोलीतील 'बालोद्यान' मोजतेय अखेरच्या घटका

Bicholim Childrens Park: एकेकाळी लहानमुलांसह अनेकांसाठी वरदान ठरलेल्या या बालोद्यानाला नवसंजीवनी कधी मिळणार, त्याची डिचोलीवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शहरात नवीन बालोद्यानांची भर पडली असतानाच, एकेकाळी सदैव गजबजणारे आणि शहरातील पहिल्यावहिल्या ‘बालोद्यान’ची मरणासन्न अवस्था झाली आहे. हे बालोद्यान अखेरच्या घटका मोजत आहे.

एकेकाळी लहानमुलांसह अनेकांसाठी वरदान ठरलेल्या या बालोद्यानाला नवसंजीवनी कधी मिळणार, त्याची डिचोलीवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. वीस वर्षांपूर्वी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हिराबाई झांट्ये सभागृहासमोर मिनरल फाउंडेशनच्या सौजन्याने हे बालोद्यान बांधण्यात आले होते. २२ ऑगस्ट २००४ यादिवशी या बालोद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर दहा-बारा वर्षे या बालोद्यानात सदैव लहान मुलांचा किलबिलाट जाणवत होता. मात्र, या बालोद्यानाची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

बालोद्यानाला नवसंजीवनी देण्याची गरज असून, त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी एका स्वयंसेवी क्लबच्या कार्यक्रमात सांगितले होते. पर्यटन खात्याकडून बालोद्यानाचा विकास करण्याचा विचार सुरू असल्याचे आमदारांनी म्हटले होते. पालिकेकडूनही या बालोद्यानाच्या उद्धारासाठी विशेष पावले उचललेली नाहीत. बालोद्यानाला नवसंजीवनी मिळाली नाही, तर भविष्यात त्याच्या खाणाखुणाही शिल्लक राहणार नाहीत.

१. या बालोद्यानात सर्वत्र झाडेझुडपे वाढलेली आहेत. झाडांझुडपांचे आक्रमण पाहता, बालोद्यान की जंगल? असा प्रश्न पडत आहे. बालोद्यानाच्या प्रवेशद्वारावर जाताच आतील स्थितीची कल्पना येते. बालोद्यानात सापांचाही संचार असतो, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या बालोद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

२. या बालोद्यानातील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले झोपळे, घसरगुंडी आदी साधनांची पूर्णपणे मोडतोड झालेली आहे. काही झोपळेही गायब आहेत. या बालोद्यानाच्या झालेल्या दुर्दशेमुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून लहान मुलांसह विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांनीही या बालोद्यानाकडे पाठ हळूहळू पाठ फिरवली.

३. बालोद्यानात विरंगुळ्यासाठी कोणीच येत नसल्याने आणि बालोद्यानाला झाडाझुडपांनी घेरल्याने अनैतिक धंदे करणाऱ्यांचे आयतेच फावत आहे. या बालोद्यानात बसून मद्यप्राशन करण्याचे प्रकारही घडत आहेत. बालोद्यानात अस्ताव्यस्त पडलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांवरून ते स्पष्ट होत आहे. प्रेमीयुगुलांकडून प्रेमाचे चाळेही या बालोद्यानात चालतात, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT