Panaji Gardens: राजधानी पणजीतील 4 प्रमुख उद्यानांना मिळणार नवे रूप; 8 कोटी रूपये खर्च करणार

दसऱ्यानंतर कामास सुरूवात; G 20 कार्यक्रमांमुळे नूतणीकरणास विलंब
4 Gardens in Panaji to be refurbished
4 Gardens in Panaji to be refurbished Dainik Gomantak
Published on
Updated on

4 Gardens in Panaji to be refurbished: गोव्याची राजधानी पणजीतील मिनेझिस ब्रागांझा, मरमेड, फ्रान्सिस्को लुईस गोम्स आणि अल्बामार या उद्यानांना आता नवे रूप मिळणार आहे.

गोवा राज्य नागरी विकास एजन्सी (GSUDA) द्वारे नियुक्त केलेल्या कंत्राटदाराद्वारे या उद्यानांचे नूतनीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात एकात्मिक लँडस्केपिंग आणि री-इलुमिनेशनचा समावेश असणार आहे आणि त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च येईल, अशी शक्यता आहे.

दरम्यान, उद्यानांच्या हे नुतणीकरणाचे काम मार्चमध्ये सुरू होणार होते. पण पणजीतील G 20 बैठका तसेच मान्सूनच्या आगमनामुळे हे काम लांबणीवर पडले होते. परंतु आता, संस्थेने काम सुरू करण्यासाठी साइट्स आधीच सुपूर्द केल्या आहेत.

4 Gardens in Panaji to be refurbished
Film City in Goa: खुशखबर! गोव्यात उभारणार फिल्मसिटी! एंटरटेन्मेंट सोसायटीतर्फे 250 एकर जागेचा शोध

या उद्यानातील ऐतिहासिक महत्त्व असलेले पुतळे आणि शिल्पे दुरुस्तीच्या कामादरम्यान सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जाणार आहे.

कामामध्ये आवश्यक असेल तेथे कंपाऊंड भिंती/संरचना नष्ट करणे आणि आवश्यक तेथे लॅटराइट दगडी बांधकाम आणि कास्ट-लोखंडी रेलिंगसह कंपाऊंड भिंती बांधणे या कामांचाही समावेष आहे.

पणजी शहरातील कॉर्पोरेशन आणि स्थानिक आमदार अतानासिओ मोन्सेरात यांच्या विनंतीचा विचार करून, आम्ही कंत्राटदाराला या उद्यानांमध्ये रात्री कुणालाही प्रवेश करता येऊ नये, यासाठी कुंपण घालण्यास सांगितले आहे.

4 Gardens in Panaji to be refurbished
गोव्याचे काजू, नारळ हरियाणात विकणार; हरियाणाची फळे, भाजीपाला गोव्यात पाठवणार...

उद्यानांच्या भिंतींचे जुने प्लास्टर काढून नवीन टाइल्स/पेव्हर ब्लॉक बसवून प्लास्टरिंग आणि फिनिशिंगची कामे केली जाणार आहेत.

शिवाय सिंचन यंत्रणा कार्यान्वित करणे, कारंज्यांची दुरुस्ती आणि नवीन खेळाच्या मैदानाची उपकरणे बसवणे हे देखील कंत्राटदाराकडूनच केले जाणार आहे," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com