Panaji Plantation: राजधानी पणजी होणार 'हिरवीगार'! महिनाभर वृक्षारोपण मोहीम; ट्री ॲपवरून ठेवता येणार लक्ष

Panaji Tree Plantation Campaign: राजधानी पणजीचे क्षेत्रफळ हे ३६ चौरस किलोमीटर एवढे आहे, परंतु सद्यःस्थितीत राजधानीत सर्वत्र इमारतीच दिसत आहेत.
Tree plantation campaign
Tree plantation campaignDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीत स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त तसेच रस्ता रूंदीकरणावेळी काही प्रमाणात झाडे हटवावी लागली, काही झाडांचे स्थलांतर करण्यात आले. परंतु राजधानी पणजीचे हरित रूप कायम राहावे व पर्यावरण संतुलनही राखले जावे, या उद्देशाने १ते ३० जून या कालावधीत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.ने कळविले आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत पणजीत एक हजार चार झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. या झाडांचे लागवड तसेच इतर काळजी नियमितपणे घेण्यात येत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने या झाडांवर देखरेखही ठेवण्यात येत आहे.

Smart City
Panaji Smart CityDainik Gomantak

स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांमध्ये स्थानिक, जंगली तसेच परदेशी झाडांचा समावेश आहे. ज्यामध्ये आंबा, चिकू पेरू, गुलाबी आपटा, गोल्डन शोवर, पारिजात, कदंब, सोनचाफा, अशोक, कडुलिंब, रेन ट्री, चाफा, माड, सुपारी, जास्वंदी अशा विविध झाडांचा समावेश आहे.

Tree plantation campaign
Climate Change In Goa: एकेकाळी पणजी जगातील सुंदर शहर होते! पण आता? तापमानवाढ आणि हरित फुफ्फुसांची संकल्पना

झाडांपेक्षा इमारती जास्त

राजधानी पणजीचे क्षेत्रफळ हे ३६ चौरस किलोमीटर एवढे आहे, परंतु सद्यःस्थितीत राजधानीत सर्वत्र इमारतीच दिसत आहेत. झाडे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी आहेत. त्यामुळे अशा प्रकारे राजधानीत झाडे लावणे व त्यांची योग्य निगा राखत वाढविणे काळाची गरज आहे.

Tree plantation campaign
Panaji: मोठी झाडे तोडली जाताहेत, टोलेजंग इमारती उभारत आहेत; 'पणजी'च्या क्षमतेचा विचार होतोय का? प्रश्‍‍न वाढत्या तापमानाचा

ट्री ॲपवर माहिती

राजधानीत जी लहान झाडे लावण्यात आली आहेत. ती कुठे लावली आहेत? त्यांची सध्याची स्थिती कशी आहे. उंची किती आहे या सर्वांची माहिती ट्री ॲपवर देण्यात आलेली असून. फोटोसह सर्व माहिती उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com