Bhoma Villagers Reply to Min Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Bhoma Villagers Protest: भोममधून रस्त्यासाठी राज्य सरकारचा बनाव; ग्रामस्थांचा दावा

भूसंपादन प्रक्रिया रद्दची मागणी

दैनिक गोमन्तक

Bhoma Villagers Protest On Highway Bypass Issue: चौपदरी रस्त्यामुळे केवळ चारच घरे जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितल्याने हा सगळा बनाव असल्याचा आरोप भोम नागरिकांनी केला आहे.

नेमके काय जाणार, कुठून रस्ता जाणार यासंबंधी कुणीच काही सांगायला तयार नाही. मात्र, नोटिशीत अनेकांची नावे आहेत. त्यामुळे समजायचे काय, असा सवालही करून आम्हाला बगलमार्गच हवा असा पुनरुच्चार भोमवासीयांनी केला.

सार्वजनिक बांधकाम खात्याने आधी भूसंपादन प्रक्रिया रद्द करावी व आणि नंतरच ग्रामस्थांशी बोलावे. भोम गावाचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चालला असून भोमवासीयांना विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असतील, तर ते क्लेशदायक असल्याचे मत भोमवासीयांनी व्यक्त केले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल हे पणजीत बसून आराखडा दाखवतात, मग भोम गावात येऊन का दाखवत नाहीत, असा सवालही भोमवासीयांनी यावेळी केला.

गावातून रस्ता काढण्याऐवजी गावाच्या वरच्या भागातून हा चौपदरी रस्ता नेल्यास कुणाचेच नुकसान होणार नाही, मग सरकार गावातूनच चौपदरी रस्ता नेण्यासाठी का आग्रही आहे, असा सवाल भोमवासीयांनी केला आहे.

"भोमवासीय का आंदोलन करत आहेत हे त्यांचे त्यांनाच समजत नाही. आपण काय मागत आहोत आणि सरकार काय देऊ पाहात आहे हे त्यांना समजत नाही. कोणीही विनाकारण गाऱ्हाणी घालू नयेत."

"यापूर्वी गाऱ्हाणी घातलेल्यांचे काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. भोमवासीयांच्या माहितीसाठी मी या विषयावर सादरीकरण करणार आहे."

- गोविंद गावडे, कला व संस्कृतीमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: व्लॉगर अक्षय वशिष्ठला जामीन मंजूर!

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

SCROLL FOR NEXT