Goa Politician Scandal: कथित सेक्‍स स्‍कँडल प्रकरणात काहीजण ‘सायबर क्राईम’च्‍या रडारवर; होणार कारवाई

नाहक बदनामी करण्याचे षड्‌यंत्र : ॲड. थोरात
Hema Sardesai rains fire on people defaming Aishwarya Korgaokar
Hema Sardesai rains fire on people defaming Aishwarya KorgaokarDainik Gomantak
Published on
Updated on

Hema Sardesai Rains Fire On People Defaming Aishwarya Korgaokar: काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी एका विद्यमान मंत्र्याचा ‘सेक्‍स स्‍कँडल’मध्‍ये सहभाग असल्‍याचा खळबळजनक दावा करून चार दिवस उलटले; परंतु अद्याप त्‍यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

दुसरीकडे मंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या कार्यालयातून तसेच चिखली उपसरपंच ऐश्‍‍वर्या कोरगावकर यांनी समाज माध्‍यमांवर आपली बदनामी झाल्‍याची तक्रार दाखल केल्‍यानंतर यंत्रणांनी तपासाला गती दिली आहे.

काहीजण ‘सायबर क्राईम’च्‍या रडारवर असून, त्‍यांच्‍यावर लवकरच कारवाई होईल, अशी माहिती मिळाली आहे.

गत विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश चोडणकर यांनी अशाच आरोपांद्वारे तत्‍कालीन मंत्री मिलिंद नाईक यांना राजीनामा देण्‍यास भाग पाडले होते. ‘त्‍या’ प्रकरणात संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्‍याने आरोपांना पुष्‍टी मिळाली होती.

चोडणकर यांनी त्‍याच प्रकारच्‍या आरोपाची पुनरावृत्ती केली असली तरी पीडित अर्थाने पोलिसांत कुणीही तक्रार दिलेली नाही. गिरीश यांनी आपण दाव्‍यावर ठाम असल्‍याचे म्‍हटले असले तरी तसे कोणतेही पुरावे त्‍यांनी सादर केलेले नाहीत. त्‍या संदर्भात स्‍पष्‍टीकरण मागणाऱ्या माध्‍यमांना चोडणकर यांनी आता टाळणे पसंत केले आहे.

ॲड. थोरात म्हणाल्या...

  1. या प्रकरणाची चौकशी व्‍हावी, अशी आमची मागणी आहे. तशी तक्रारही दिलेली आहे.

  2. शहानिशा न करता नाहक बदनामी करण्याचे षड्‌यंत्र समाज माध्यमांतून केले जात आहे.

  3. चोडणकरांनी ज्या बातमीचे ट्विट केले आहे, ते कोणत्या वर्तमानपत्रातील हे स्‍पष्‍ट करावे.

Hema Sardesai rains fire on people defaming Aishwarya Korgaokar
Goa Fertility Rate: गोव्यासाठी धोक्याची घंटा, प्रजनन दरात लक्षणीय घट; मोफत IVF उपचार तारणार का?

मुख्यमंत्र्यांकडे मागितली वेळ

समाज माध्यमांतून एखाद्या व्यक्तीबाबत होत असलेल्या बदनामीबाबत आळा घालण्यासाठी कडक कायदा आणला जावा. राज्य सरकारने यासाठी त्वरित पावले उचलावीत.

अशा प्रकाराविषयी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, त्यावेळी त्यांच्याकडे या कायद्याविषयी मागणी करणार असल्याचे हेमा सरदेसाई यांनी सांगितले.

‘चारित्र्यहनन तत्‍काळ थांबवा’

अनिता थोरात : नामोल्‍लेख टाळून तारा केरकरना फटकारले

कथित सेक्स स्कँडल प्रकरणाविषयी कोणतीही माहिती न घेता किंवा पुरावे नसताना ऐकीव माहितीच्‍या आधारे पत्रकार परिषद घेऊन बिगरसरकारी संघटना (एनजीओ) चारित्र्यहनन करणारे प्रश्‍‍न उपस्थित करतातच कशा, असा सवाल ॲड. अनिता थोरात यांनी तारा केरकर यांना त्यांचे नाव न घेता विचारला आहे.

दरम्यान, गायिका हेमा सरदेसाई यांनी उपसरपंच ऐश्‍वर्या कोरगावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.

पणजीतील तारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला हेमा सरदेसाई, ॲड. थोरात यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्या नेली रॉड्रिग्स आणि चिखलीच्या उपसरपंच ऐश्‍वर्या कोरगावकर यांची उपस्थिती होती.

सरदेसाई म्हणाल्या, समाजमाध्यमांतून एखाद्या युवतीवर शिंतोडे उडविले जात असल्याचे आपणास पाहावले नाही. ऐश्‍वर्याच्या पतीने स्पष्टीकरण दिले आहे, तो तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही असेही सरदेसाई म्‍हणाल्‍या.

Hema Sardesai rains fire on people defaming Aishwarya Korgaokar
U-19 Goa Chess Competition: राज्यस्तरीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत मंदार, अस्मिता विजेते

तपास सुरू

समाज माध्‍यमांवरून फोटो व आक्षेपार्ह व्‍हिडिओ पसरवून बदनामी केल्‍याप्रकरणी तपास सुरू आहे. काही संशयित दृष्टिपथात असून, त्‍यांच्‍यावर कारवाई होईल, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली.

"मंत्री गुदिन्‍हो तसेच महिला लोकप्रतिनिधीच्‍या बदनामी प्रकरणी दाखल तक्रारीनुसार सखोल तपास सुरू आहे. सर्व आयाम पडताळले जात आहेत. संबंधितांवर लवकरच कारवाई होईल."

जसपाल सिंग, पोलिस महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com