Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

शिक्षण, आरोग्य सुविधांचा पाया भाऊसाहेब बांदोडकरांनी घातला: कोरगावकर

बांदोडकर जयंतीनिमित्त पेडणे येथील मगो कार्यालयातील कार्यक्रमात कोरगावकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा मुक्तीनंतर वाड्यावाड्यावर प्राथमिक शाळा, प्रत्येक तालुक्यात वैद्यकीय सेवेसाठी प्राथमिक वैद्यकीय केंद्रे, सरकारी इस्पितळ व गोवा वैद्यकीय महा विद्यालय, शेतकरी हा खऱ्या अर्थाने या जमिनीचा मालक व्हावा, म्हणून कसेल त्याची जमीन व राहिल त्याचे घर, कुळ मुंडकार कायदा असे अनेक कायदे करून भाऊसाहेब बांदोडकरांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली, असे प्रतिपादन राजन कोरगावकर यांनी केले.

बांदोडकर जयंतीनिमित्त पेडणे येथील मगो कार्यालयातील कार्यक्रमात कोरगावकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संजय तुळसकर, माजी उपनगराध्यक्ष सावळ देसाई, वामन कवठणकर, तुळशीदास कवठणकर, अभिषेक तोरसकर, परेश वालम आदी मान्यवर उपस्थित होते.

भाऊसाहेब दूरदृष्टीचे नेते असे डॉ. शेट्ये डिचोलीत म्हणले

भाऊसाहेब बांदोडकर हे दूरदृष्टीचे नेते होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कधीही विस्मृतीत जाणार नाही. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे, ही काळाची गरज आहे, असे मत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले. गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त मुळगाव येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. शेट्ये बोलत होते. शिक्षण क्षेत्रात आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाहीही डॉ. शेट्ये यांनी दिली.

डॉ. शेट्ये यांनी भाऊसाहेबांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवाडकर, मुळगावचे सरपंच गजानन मांद्रेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण बेतकीकर, शिक्षा व्हिजनचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश आमोणकर, दिलीप धारगळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नारायण बेतकीकर यांनी केले.

वास्कोत भाऊसाहेबांना आदरांजली

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी भरीव कार्य केल्यामुळे आज गोवा राज्य अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य अमूल्य असून त्याचा आम्हांला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन गोमंतक मराठा समाज मुरगांव तालुका समितीचे अध्यक्ष कृष्णा तोरसकर यांनी केले.

स्व. भाऊसोहबांच्या जयंतीनिमित्त वास्को येथील भाऊसाहेबांच्या जोशी चौकातल्या अर्धपुतळ्या जवळ गोमंतक मराठा समाजाचे बांधव आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

अध्यक्ष कृष्णा तोरसकर तसेच जेष्ठ सदस्य नरेंद्र नाईक व महिला अध्यक्ष शुभांगी नार्वेकर यानी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला हार, फुले अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी सचीव सुनील नाईक, खजिनदार चंदा बांदेकर, महिला उपध्यक्ष बिंदिया काकोडकर सदस्य बिपीन काकोडकर, दिपक काणकोणकर, मिलिंद काकोडकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashok Saraf: अभिनयाची जादू आजही कायम! अशोक सराफांनी पुन्हा करुन दाखवला 'प्रोफेसर धोंड'चा सीन; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT