पणजी बाजारात मासळी महागली

पापलेट 1200 रुपये तर तारली 150 रुपये किलो
masali bajar
masali bajarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मासळी हा गोवेकरांच्या आहारातील महत्‍वाचा घटक. जर मासळी नसेल तर पोटात दोन घास कमीच जातात. गेल्या काही दिवसांपासून मासळी दरात चढ-उतार सुरू आहे. आज पणजी मार्केटमध्ये पापलेट, इसवण, कर्ली, लेपो, बांगडे, तार्ली, खेकडे, कोळंबी आदी विविध प्रकारची मासळी उपलब्ध होती. काही मासळी विक्रेते किलोच्या दरात तर काही प्रती वाटा दराने मासळी विकत होते. मासळी खरेदी करण्यासाठी पणजी परिसरातील ग्राहकांनी गर्दी केली होती.

masali bajar
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची दुरावस्‍था

पापलेट, इसवण आणि कोळंबी, मासळी खरेदीला अनेक ग्राहक पसंती देत असतात. मात्र, या मासळीचे दर अनेकांच्या खिशाला परवडत नाहीत. पापलेट बाराशे रुपये प्रती किलो, तर इसवण 850, कोळंबी आकारानुसार 300, 500, 600 रुपये प्रती किलो दराने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मात्र, तार्लीच्या दरात 50 रुपयांनी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात तार्ली 200 रुपये प्रती किलो दराने विकली जात होती.

masali bajar
Goa Government: माविन, विश्वजीत, काब्राल यांची मंत्रिपदे निश्चित

कोविडचा संसर्ग कमी झाल्याने गोव्यात हळूहळू पर्यटक येत आहेत. काही पर्यटक प्रामुख्याने गोमंतकीय खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी गोव्यात येत असतात. अशावेळी मासळीचे वाढीव दराचा परिणाम जेवणाच्या ताटावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोमंतकीय नागरिक प्रामुख्याने मत्साहारी आहेत. मात्र, मासळीचे दर खिशाला परवडत नसल्याने अनेकजण चिकन खरेदीकडे वळत आहेत. मासळीच्या किंमतीत घट होणे गरजेचे आहे. कारण गोमंतकीयांच्या आहारातील तो एक महत्त्वाचा घटक आहे.

मासळी दर प्रती किलो

1. तार्ली 150

2. बांगडे 200

3. खेकडे 200

4. कर्ली 350-400

5. कोळंबी 300 ते 600

6. पापलेट 1200

7. लेपो 250

8. माणकी 400

9. इसवण 800 ते 850

प्रती वाटा दर

1. तार्ली 100 ते 150

2. बांगडा 100 ते 200

3. कोळंबी 200 ते 500

4. इसवण 700 ते 1200

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa burglaries festive season crime news
bicholim marigold flower cultivation
honda gram sabha mining opposition
verna police station Sexual Assault case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com