School Hijab Row: Dainik Gomantak
गोवा

School Hijab Row: आमच्यावरील आरोप तथ्यहीन; भारतीय विद्यार्थी इस्लामिक संघटना

School Hijab Row: झुआरीनगरातील एका मशिदीत विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोप तथ्यहीन आहे.

दैनिक गोमन्तक

School Hijab Row: झुआरीनगरातील एका मशिदीत विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोप तथ्यहीन आहे. या प्रकरणात एका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांचे केलेले निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी भारतीय विद्यार्थी इस्लामिक संघटनेचे गोवा क्षेत्र अध्यक्ष उस्मान खान पठाण यांनी सांगितले.

पणजीतील संस्थेच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोहेब नाईक आणि मझर मोकाशी उपस्थित होते. उस्मान खान म्हणाले, विद्यार्थ्यांना मुस्लिम धर्माबाबत माहिती मिळावी, मशिदीमध्ये महिलांना प्रवेश का दिला जात नाही?

मुस्लिम धर्माच्या विविध परंपरांबाबत असणारे औत्सुक्य समजावे, धर्मा-धर्मांमधील संभ्रम नष्ट होऊन शांती आणि धार्मिक सलोखा अबाधित राहावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांवर सक्ती नाहीच

मशिदीत इस्लामिक रितीरिवाज पाळण्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती केली नाही. परंतु काही गट समाजामध्ये तेढ निर्माण करून आपले राजकीय इप्सित साध्य करू इच्छितात. ते अशा प्रकारच्या उपक्रमांबाबत अपप्रचार करत आहेत.

अशा प्रकारच्या उपक्रमांना शिक्षण खात्याने प्रोत्साहन देणे चुकीचे असून इतर धर्मियांना विविध धर्मांबाबत माहिती मिळतेय, ही चांगली बाब आहे, असे उस्मान खान पठाण म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT