Bharat Gaurav Tourist Train will come to Goa  Dainik Gomantak
गोवा

Bharat Gaurav Tourist Train: गोव्याला येणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेन; 28 सप्टेंबरला मदुराईतून सुटणार...

मडगावात मुक्काम; 7 ऑक्टोबरपर्यंत हैदराबाद, अजिंठा-वेरूळ, मुंबई आणि गोवा अशी राउंड ट्रिप करणार

Akshay Nirmale

Bharat Gaurav Tourist Train will come to Goa: भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष रेल्वेगाडी 28 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता तामिळनाडुतील मदुराई येथील कुडाळनगर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही रेल्वेगाडी पोहोचेल.

दरम्यान, ही रेल्वेगाडी 28 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत देशातील काही महत्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहे. त्यामध्ये गोव्याचाही समावेश आहे.

मदुराई येथील कुडाळनगर रेल्वे स्थानक ते हैदराबाद, अजिंठा, वेरूळ, मुंबई आणि गोवा अशी राउंड ट्रिप ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन करणार आहे.

ट्रेन क्रमांक 06905 गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कुडाळ नगर रेल्वे स्थानकातून सुटेल आणि नागरकोइल टाऊन, तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम टाऊन, पलक्कड, सेलम, पेरांबूर, मौला अली मार्गे प्रवास करेल.

ही ट्रेन रविवारी सिकंदराबादला पोहोचेल आणि सोमवारी औरंगाबादला पोहचेल. 4 ऑक्टोबरला लोकमान्य टिळक टर्मिनसला ही ट्रेन पोहोचेल. त्यानंतर गोव्यात मडगाव येथे एक रात्र मुक्काम केल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9.15 वाजता कुडाळ नगरला परतणार आहे.

पर्यटकांना चारमिनार, गोवळकोंडा किल्ला, सालारजंग संग्रहालय पाहण्यासाठी नेले जाईल. तसेच रामोजी फिल्म सिटीलाही पर्यटक भेट देणार आहेत. याशिाय वेरूळ आणि अजंठा येथील लेणी पर्यटक पाहू शकतात.

मुंबईत पर्यटकांना जुहू बीच, हँगिंग गार्डन्स, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, वांद्रे ब्रिज येथे भेट देता येईल.

तर गोव्यात इच्छुक पर्यटकांना मांडवी नदीच्या समुद्रपर्यटनासाठी नेले जाईल. याशिवाय कळंगुट बीच आणि गोव्यातील कॅथेड्रलला भेट देऊ शकतात. तिकीट उपलब्धता आणि वेळापत्रकासह प्रवासाविषयी अधिक माहिती www.railtourism.com वर मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT