Colvale Police News: चिप्सच्या पाकिटावरून दोन गटांत राडा; जोरदार मारामारी, थिवी येथील प्रकार

कोलवाळ पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल
Colvale Police News
Colvale Police NewsDainik Gomantak

Colvale Police News: दुकानात लावलेल्या बटाट्याच्या चिप्सच्या पाकिटांवरून थिवी येथे दोन गटात जोरात मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोलवाळ पोलिस ठाण्यात दोन परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

थिवी रेल्वेस्थानकाजवळील शिवप्रसाद सिंग हे येथील दुकानात गेले होते. या दुकानातून त्यांनी चिप्स खरेदी केली. त्यावेळी चिप्सच्या पाकिटावरील एक्सपायरी डेट उलटून गेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ते दुकानदाराच्या लक्षात आणून दिले.

त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी थिवी येथील रहिवासी शिवम परब आणि विघ्नेश चारी यांच्यासह अन्य चार ते पाच जणांनी दुकानमालक व त्यांच्या कामगारांना मारहाण केली. थप्पड, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, काचेच्या बाटल्या अंगावर फेकून मारणे.. असे प्रकार येथे सुरू होते.

Colvale Police News
Goa Theft: चिखलीत मोलकरणीचा 7 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; 2 लाखाची रोकडही लुटली...

या हल्य्यानंतर दुकानातील कामगारांनीही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. यात दोन्हीकडील काहीजण जखमी झाले आहेत.

या प्रकारानंतर दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी आणि कोलवाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भरत खरात, हेड कॉन्स्टेबल सीताराम चोडणकर हे पुढील तपास करत आहेत.

Colvale Police News
Goa Medical College: राज्य माहिती आयोगाची 'गोमॅको'च्या अधिकाऱ्याला नोटीस; 'आरटीआय'अंतर्गत दिली होती अपुरी माहिती

या घटनेतील संशयितांनी भविष्यात असे काहीही करू नये आणि त्यामुळे परिसरात शांतता बाधित होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात, असे समजते. याबाबतचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com