Bicholim Scrap Yard Dainik Gomanatak
गोवा

Bicholim Scrap Yard: डिचोली मतदारसंघातील भंगार अड्डे ‘आरजी’च्या रडारवर!

पाठपुराव्यानंतर सरकारी यंत्रणेने केली काही ठिकाणी कारवाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

Bicholim Scrap Yard on RG's Radar: राज्यात अनेक ठिकाणी होत असलेली बेकायदा कामे ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स''चे कार्यकर्ते उघड करून त्यावर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेला भाग पाडत आहेत.

आता ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी डिचोली मतदारसंघातील बेकायदेशीर भंगार अड्डे हटविण्यासाठी मोहीम उघडली आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘आरजी’चे कार्यकर्ते अनिश नाईक यांनी लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील भंगार अड्डा हटविण्यात यश मिळविले होते. तसेच डिचोली नगरपालिका क्षेत्रातील तीन भंगार अड्ड्यांवर कारवाई झाली आहे.

दुसरे कार्यकर्ते आशिष परब यांनीही एक वर्षापूर्वी चार बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रार केली होती. माहिती हक्क कायद्यांतर्गत तिथे केवळ चारच नव्हे, तर आठ भंगार अड्डे असल्याचे निदर्शनात आले.

आशिष यांनी पाठपुरावा केल्यामुळे तीन भंगार अड्डे हटविण्यात आले. बाकीचे तीन भंगार अड्डे कारवाईपूर्वीच हटले गेले. उर्वरित दोन भंगार अड्ड्याच्या मालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची मागणी केल्यामुळे त्यावर निर्णय येणे बाकी असल्याची माहिती अनिश नाईक यांनी दिली.

सध्या डिचोली पालिका क्षेत्रातील दोन भंगार अड्डे, मुळगाव व लाटंबार्से येथील प्रत्येकी एक भंगार अड्डा ‘आरजी’च्या रडारवर आहे. या बेकायदा भंगार अड्ड्यांच्या आडून अनेक अवैध प्रकार सुरू असल्याने त्याविरोधात मोहीम उघडली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT