Betting on Cricket in Porvorim Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी

पोलिसांकडून 6 जणांना अटक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

दैनिक गोमन्तक

पणजी : पर्वरी येथे पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीशी संबंधित छाप्यात 6 जणांना अटक केली आहे. पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना पर्वरीमधून ही टोळी रंगेहाथ पकडली गेली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणांसोबत संबंधित वस्तूदेखील जप्त केल्या आहेत. (Betting on Cricket in Porvorim News Updates)

या छाप्यात, पोलिसांनी 13 मोबाईल, 3 लॅपटॉप असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यात 6 जणांना अटक (Arrest) देखील करण्यात आली आहे. क्रिकेट सट्टेबाजीशी संबंधित माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दखल घेत ही कारवाई केली. ज्या 6 जणांना अटक केली, त्या व्यक्ती याआधीही सट्टेबाजी करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी ही टोळी रविवारी रंगेहाथ पकडली. त्यांना जेरबंद करण्यात आले असून या प्रकरणी पोलिस पुढील तपास (Enquiry) करीत आहेत.

दरम्यान, क्रिकेटवर सट्टा लावण्याचे प्रकार अनेकदा घडत असून पोलिस (Police) कारवाईलाही हे सट्टेबाज धजावत नाहीत. त्यामुळे मटक्याचा जसा राज्यात व्यवहार चालतो, तसाच क्रिकेट खेळावर सट्टा लावण्याचा प्रकारही बोकाळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT