बाबू कवळेकर अडकले वादाच्या फेऱ्यात

टपाल मतांसाठी ऑफर्सचा गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप
Babu Kavlekar
Babu KavlekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे प्रत्येक मत उमेदवारांसाठी बहुमूल्य आहे. ‘पोस्टल बॅलट’ मतदान सध्या सुरू असल्याने ही मते मिळवण्यासाठी पैशांच्या जोरावर ती विकत घेण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. केपेचे भाजप उमेदवार व उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर बॅलट मतांसाठी पैशांच्या ऑफर्स देत असल्याची ऑडिओ क्लिप असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ट्विट करून केल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे कवळेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. (Babu Kavlekar News Updates)

Babu Kavlekar
गोव्यात 'कार्निव्हल फेस्टिवल'च्या तयारीला सुरुवात

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे तीनवेळा काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर केपे मतदारसंघातून निवडून आले आहेत व चौथ्यांदा ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. यावेळी या मतदारसंघातील लढत अटीतटीची झाली आहे. त्यामुळे कवळेकर हे चिंतेत आहेत. मते वाढवण्यासाठी पोस्टल बॅलट मतेच उरलेली आहेत. निवडणूक जिंकण्याची ठाम आशा नसलेल्या उमेदवारांनी या पोस्टल बॅलट मतांच्या कर्मचाऱ्यांशी आपल्या कार्यकर्त्यांकरवी किंवा स्वतःहून संपर्क साधण्यास सुरवात केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी अशा प्रकरणात गुंतलेल्या उमेदवाराचे नाव उघड केले नव्हते.

गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी काल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याची तोंडी माहिती दिली होती. आज त्यांनी ट्विट करून कवळेकर यांच्या नावाचा पर्दाफाश करत व त्यासंदर्भातची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करून कवळेकर यांची झोप उडविली आहे. या प्रकरणानंतर अनेक उमेदवारांनी सावधगिरी बाळगण्यास सुरवात केली आहे. मतदानाच्या दिवशी ड्यूटीवर असल्याने मतदान न करू शकलेल्या सुमारे १५,७१६ सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलट मतपत्रिका देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी कवळेकर (Babu Kavlekar) यांच्या मोबाईलवरून अश्लील चित्रफीत व्हायरल झाली होती, तेव्हा ते अडचणीत आले होते. मात्र, त्याच्याशी काहीच संबंध नाही असा दावा करून त्यांनी तक्रार सायबर कक्षाकडे दिली होती. या प्रकरणाचा तपास सध्या बंद ठेवला गेला आहे. काँग्रेसमध्ये असताना केपे येथे मटका जुगार व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला होता तेव्हाही कवळेकर अडचणीत आले होते. त्यामुळे कवळेकर हे वादाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

Babu Kavlekar
रेजिनाल्ड यांचा भगवा फेटा मोठा चर्चेचा विषय; हालचालींबाबत उत्सुकता

कवळेकर काँग्रेसच्या रडारवर

निवडणुकीपूर्वी काँग्रेसने एका भाजप (BJP) आमदार तथा मंत्र्यांविरुद्ध एका तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणीचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मात्र, दिलेल्या मुदतीत सरकारने काहीच न केल्याने त्या आमदाराच्या नावासह व्हिडिओ क्लिप काँग्रेसने केली होती. आता मतदानानंतर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना काँग्रेसने जाळ्यात अडकवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com