गोव्यात कोरोना संक्रमणाचा दर घटला

गोमंतकीयांना मोठा दिलासा, कोरोनामुळे 24 तासांत 3 बळी
corona case in goa
corona case in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सक्रिय बाधितांचे प्रमाण झपाट्याने घटत असून संक्रमण (पॉझिटिव्हिटी) दरही कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाबत राज्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. तिसरी लाट ओसरल्याचं चित्र आता दिसत आहे. (corona case in goa News Updates)

corona case in goa
पराभवाची जाणीव झाल्यानेच दबावतंत्र : गिरीश चोडणकर

राज्यात (Goa) कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 3 बळी गेले असून एकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. रविवारी कोरोना संक्रमण दर 2.93 टक्के इतका होता. सक्रिय रुग्णांची संख्या 570 इतकी खाली आली आहे. गेल्या 24 तासांत नवे 40 कोविड रुग्ण सापडले.

corona case in goa
रस्त्यांवरील निराधारांसाठी म्हापशात आश्रम

राज्यात आतापर्यंत 2 लाख 44 हजार 713 नागरिकांना कोरोनाची (Corona) बाधा झाली असून यापैकी 2 लाख 40 हजार 351 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.22 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 570 सक्रिय रुग्ण असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूचा (Death) आकडा 3 हजार 792 झाला आहे. रविवारी 1,361 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी 144 जण कोरोनातून बरे झाले. तर उपचारासाठी भरती केलेल्या चौघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com