Health Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajeet Rane: राज्यात सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा

Vishwajeet Rane: विश्वजीत: पंतप्रधानांचे सहकार्य उपयोगी

दैनिक गोमन्तक

Vishwajeet Rane: केंद्र सरकारने केलेल्या विविध प्रकारच्या मदतीमुळे गोवा सरकार राज्यातील जनतेला सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देऊ शकले, असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील आरोग्य सुविधांच्या बाबत मंत्री राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत म्हणाले, केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे राज्यात आज देशातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

मंत्री राणे म्हणाले, हृदयरोग, कर्करोग या क्षेत्रातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा यात समावेश आहे. गोवा सरकार मुलाच्या जन्मापूर्वीपासून महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे.

राज्यातील महिला गरोदर राहिल्यापासून त्यांचे मूल एक ते दीड वर्षाचे होईपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याबरोबर मोफत उपचार दिले जातात. यादरम्यानच्या काळात महिला आणि मुलांना सकस आहार मिळावा, याकरता न्यूट्रिशन सपोर्ट दिला जातो. त्यांची आरोग्य खाते व महिला आणि बालकल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्व प्रकारची काळजी घेतली जाते.

आज बाल रोग क्षेत्रात सरकारने विविध सुविधा उभारल्या आहेत. या सुविधांच्या मार्फत राज्यात मूल जन्माला येण्यापूर्वीपासून त्याची काळजी घेतली जाते. यासाठी डॉ. विरेन गावकर डॉ. हर्षद कामत सतत सक्रिय आहेत.

20 वर्षांपूर्वी राज्यात अनेक आरोग्य सुविधांचा अभाव होता. मग तो हृदयरोग असो किंवा महिला आणि बाल कल्याणाच्या क्षेत्रात असो. आज ती परिस्थिती राहिली नाही. आरोग्य क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन झाले असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आज बहुतांश रोगांच्या बाबतीत अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

याचा लाभ माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही घेतला आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सरकारने घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे, असेही मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT