Ration Food Supply: ऐन दिपावलीच्या तोंडावर रेशनवर धान्यपुरवठाच नाही?

Ration Food Supply: गोवा फॉरवर्ड: दुकानदारांची थकबाकी देण्याची मागणी
Ration Food Supply
Ration Food SupplyDainik Gomantak

Ration Food Supply: दिपावली ऐन तोंडावर आली असताना राज्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांवर नागरीपुरवठा खात्याकडून धान्यसाठ्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे खात्याने शिधापत्रिकाधारकांना धान्यसाठ्याचा दीपावलीपूर्वी पुरवठा करावा.

Ration Food Supply
National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान गोव्याचे देदीप्यमान यश, ‘टॉप टेन’मध्ये स्थान

दुकानधारकांची सुमारे एक कोटीची थकीत असलेली बिले केंद्र सरकारकडून येणाऱ्या अनुदानाची वाट न पाहता राज्य सरकारने सध्या स्वतःच्या तिजोरीतून ती द्यावीत, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने मुख्य सचिवांना पत्र पाठवून केली आहे.

पणजीतील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून स्वस्त धान्य दुकानधारकांना दिली जाणारी गेल्या चार महिन्यांची बिले थकीत आहेत.

Ration Food Supply
National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान गोव्याचे देदीप्यमान यश, ‘टॉप टेन’मध्ये स्थान

त्यामुळे त्यांनी नागरीपुरवठा खात्याच्या गोदामातून धान्यसाठा उचलण्यास नकार दिलेला असला तरी अजून पुरेसा धान्यसाठा गोदामात नाही. त्यामुळे खात्याने दिवाळीपूर्वी हा धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानांवर उपलब्ध करावा.

सामान्य लोकांना या धान्यसाठा वेळेत न मिळाल्यास दिवाळी उत्सव सामान्य लोकांना साजरा करणे कठीण होणार आहे.

स्वस्त धान्य दुकानधारकांची 1 कोटीची बिले देण्यास सरकारकडे पैसा नाही, मात्र राज्यातील विविध इव्हेंट कार्यक्रमांसाठी सुमारे 100 कोटी खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे आहे, अशी टीका कामत यांनी केली.

कोर्टाकडून मिळेल न्‍याय

कला अकादमी येत्या 10 नोव्हेंबरला लोकार्पण करण्यात येत असली तरी त्याच्या कामासंदर्भातची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. न्यायसंस्थेकडून आम्हांला न्याय मिळेल, याबाबत विश्‍वास आहे.

या अकादमीच्या बांधकामाची तपासणी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत व्हायची आहे. त्यानंतरच ही कला अकादमी कितपत वापरासाठी सुरक्षित आहे, हे उघड होणार आहे, असेही कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com