BENAULIM  Dainik Gomantak
गोवा

बाणावलीत पाद्री विरुध्द स्थानिक वाद पेटला; चर्चवरील मोर्चानंतर पाद्रींनी स्वत:ला घेतले कोंडून

चर्च परिसरात तणावाचे वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

benaulim : बाणावली येथील होली ट्रिनिटी या चर्चच्‍या मुख्‍य पाद्री अँथनी रॉड्रीगीस यांचा कारभार मनमानीपणाचा असल्‍याचा आरोप करुन त्‍यांची या चर्चमधून त्‍वरित बदली करावी अशी मागणी घेऊन आज स्‍थानिकांचा एक मोठा जमाव चर्चवर चाल करुन आल्‍याने फादर रॉड्रीगीस यांना स्‍वत:ला एका खोलीत स्‍वत:हून बंदिस्‍त होण्‍याची पाळी आली.

या घटनेमुळे चर्च परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्‍याने कायदा व सुव्‍यवस्‍था सुरळीत ठेवण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता.

फा. रॉड्रीगीस आणि स्‍थानिक यांच्‍यात मागच्‍या दोन महिन्‍यांपासून तणावपूर्ण वातावरण असून मधल्‍या काळात या चर्चमधील एका कनिष्‍ठ पाद्रीची बदली केल्‍याने स्‍थानिकांचे मत फा. रॉड्रीगीस यांच्‍याबद्दल अधिकच प्रक्षुब्‍ध झाले होते.

फा.रॉड्रीगीस यांच्‍या विरोधात स्‍थानिकांनी आर्च बिशप कार्यालयात तक्रार केली होती. आज या कार्यालयाचे एक शिष्‍टमंडळ चौकशीसाठी चर्चमध्‍ये येणार होते. मात्र हे शिष्‍टमंडळ आलेच नाही. त्‍यामुळे भडकलेल्‍या स्‍थानिकांनी चर्चवर मोर्चा आणणे पसंत केले.

मोठ्या प्रमाणावर जमाव चाल करुन आल्‍याने फा. रॉड्रीगीस यांनी स्‍वत:ला एका खोलीत बंदिस्‍त करुन घेतले. त्‍यानंतर पोलिसांना पाचारण करण्‍यात आले. कोलवा, मायणा-कुडतरी, वेर्णा आणि फातोर्डा येथील पोलीस या ठिकाणी तैनात करण्‍यात आले होते.

परिस्‍थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सासष्‍टीचे मामलेदार लक्ष्‍मीकांत देसाई हेही घटनास्‍थळी हजर झाले. मडगावचे पाेलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी स्‍थानिकांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र लोक ऐकण्‍याच्‍या परिस्‍थितीत नव्‍हते. सायंकाळी उशिरापर्यंत या भागातील तणाव कायम होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT