Bicholim News : डिचोलीत वेदांताच्या खाणीवर बाहेरील कामगारांना रोखले

पूर्वाश्रमीचे कामगार एकवटले, संघर्षाच्या पवित्र्यात
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोलीतील वेदांता (सेझा) खाणीवर बाहेरील कामगारांना विरोध करत, पूर्वाश्रमीच्या अस्वस्थ कामगारांनी खाणीवर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना रोखून धरले. धबधबा येथील प्लांटवर बाहेरील कामगार काम करीत असल्याची कुणकुण लागताच पूर्वाश्रमीचे अस्वस्थ कामगार पुन्हा एकदा एकवटले. या कामगारांनी आज (सोमवारी) सकाळी कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खाणीवर धडक दिली.

खाणीवरील अधिकारी मांद्रेकर यांची भेट घेऊन त्याठिकाणी काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना काम करण्यास प्रतिबंध केला. संबंधित कामगारांनी काम करणे बंद केल्यानंतर संतप्त कामगार माघारी फिरले.

लिलाव प्रक्रियेतून डिचोलीतील खाण ब्लॉक आपल्याकडेच ठेवण्यात वेदांता कंपनीन यशस्वी ठरली आहे. अद्याप खाण व्यवसाय रीतसर सुरू झालेला नाही. तरीदेखील कंपनीकडून पूर्वाश्रमीच्या कामगारांना डावलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा मुद्दा न्यायप्रविष्ठही आहे.

Bicholim
Vijai Sardesai : फातोर्डा येथील सखल भागात पूराची शक्यता; सरदेसाईंनी व्यक्त केली चिंता

तर गप्प बसणार नाही!

आम्हाला डावलून बाहेरील कामगारांना आणून खाणीवर काम करण्याचा प्रयत्न झाला, तर कामगार स्वस्थ बसणार नाहीत. जोपर्यंत स्थानिक कामगारांना कामावर घेत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे, असा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर यांनी दिला आहे.

कंपनीने मांडली बाजू

एक जबाबदार कंपनी म्‍हणून आम्ही सर्व लागू कायदे आणि नियमांचे पूर्णपणे पालन करतो. सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवण्यात येत आहे. 2012 मध्ये खाणी बंद झाल्‍यानंतरही कंपनीने सर्व कामगारांना कायम ठेवले आणि आजपर्यंत त्यांना योग्य मोबदला देत आहे, अशी बाजू वेदांत सेसा गोवातर्फे मांडण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Contract Workers Salary Rules
CM Pramod Sawant
Sesa workers indefinite protest Goa layoffs issue
Mulgao Mining
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com