Liquor Consuming State: भारतात सर्वाधिक दारू रिचवण्यात 'हे' राज्य आघाडीवर; गोवा, दिल्ली राहिले मागे

या अव्वल राज्यातील महिलादेखील मद्यपानात आघाडीवर
Most Liquor Consuming State
Most Liquor Consuming StateDainik Gomantak
Published on
Updated on

Most Liquor Consuming State in India: भारतात सर्वाधिक दारू कुठल्या राज्यात पितात, असे जर विचारले तर कदाचित लोक गोवा, पंजाब, दिल्ली अशी नावे घेण्याची शक्यता जास्त असते. खाण्यापिण्याच्या बाबतीत या राज्यातील नागरिक उदार मानले जातात.

येथे मद्यपान करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तथापि, लोकसंख्येच्या एकूण प्रमाणात होत असलेल्या मद्यसेवनात ही राज्ये मागे आहेत.

Most Liquor Consuming State
Goa Rajyasabha Election: खा. विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मुदत 'या' दिवशी संपणार; 23 जुलैला निवडणूक शक्य

गोवा आणि मद्यपान हे एक समीकरण बनले आहे. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्यांच्या किंमती कमी आहेत. पण, तरीही मद्यपानात देशात गोवा मागे आहे. तर देशात मद्यपानात आघाडीवर असलेले राज्य आहे अरूणाचल प्रदेश.

अरूणाचल प्रदेशात एकूण लोकसंख्येपैकी 53 टक्क्याहून अधिक लोक मद्यपान करतात. दारू रिचवण्यात तेलंगणा राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे 43 टक्के लोक दारूचे सेवन करतात.

विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशातील स्त्रियादेखील मद्यपानात आघाडीवर आहेत. येथील 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांपैकी 24 टक्के महिला मद्यपान करतात. त्या खालोखाल सिक्कीम राज्यातील 16 टक्के महिला मद्यपान करतात.

Most Liquor Consuming State
New Parliament Murals: गोव्यातील आर्टिस्टला मिळाली नवीन संसदेत म्युरल्स साकारण्याची संधी

दरम्यान, गतवर्षीच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) नुसार मद्यपान करणाऱ्या 15 ते 49 या वयोगटातील पुरुषांची देशातील सर्वाधिक टक्केवारी गोव्यात आहे. या वयोगटातील 59 टक्के पुरूष मद्यपान करतात.

या वयोगटातील महिलांची आकडेवारी 5 टक्केपेक्षा कमी आहे. गोव्यानंतर अरुणाचल प्रदेशात हे प्रमाण 57 टक्के, तेलंगणा 50 टक्के तर लक्षद्वीपमध्ये सर्वात कमी 1 टक्का आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com